ETV Bharat / state

Fraud : व्यवसायिकाला चौघांनी लावला 151 कोटींचा चुना - परसकुमार केशुलाल जैन

परसकुमार केशुलाल जैन यांना चौघांनी 151 कोटींचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. दानसिंग शेरसिंग मावारी उर्फ धरमसिंग मावारी (वय, 45, माळीवडा, ठाणे), अमितसिंग खाटी (वय, 32, टेमघर, भिवंडी), संजय पडेल (रा. समता नगर, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत.

Fraud
Fraud
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 10:13 PM IST

ठाणे : एका व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून 151 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा कट रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणाचा तपास करून चौघांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दानसिंग शेरसिंग मावारी उर्फ धरमसिंग मावारी (वय, 45, माळीवडा, ठाणे), अमितसिंग खाटी (वय, 32, टेमघर, भिवंडी), संजय पडेल (रा. समता नगर, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत.

150 कोटी रुपयाची फसवणूक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परसकुमार केशुलाल जैन (वय 60, रा. वर्तकनगर, ठाणे) यांचा भिवंडी येथे विद्युत साहित्य विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. याच प्रकरणातील चार आरोपींनी एकमेकांसोबत कट रचला. त्यांनी तक्रारदार पारसकुमार केशुलाल जैन यांचा फायदा घेत त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी 26 मार्च 2008 ते 17 जुलै 2023 दरम्यान आर्थिक फायद्यासाठी तक्रारदाराची फसवणूक केली. बनावट स्वाक्षरी, अंगठ्याचे ठसे वापरून व्यावसायिकाला 150 कोटी रुपयचा चुना लावला.

जिवे मारण्याच्या धमक्या : शिवाय तक्रारदार व्यवसायिकानं पुरवलेल्या इलेक्ट्रिक साहित्याचं 1 कोटी 65 लाख रुपयांची रक्कम न देता चौघांनी मिळून आर्थिक फसवणूक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे तक्रारदार जैन यांच्या खोट्या सह्या, अंगठे मारून भिवंडीतील हायप्रोफाईल अरिहंत सिटी फेज एक, दोन येथील सदनिका विक्री देखील केली. यामधील गुंतवणूकदार, तसेच त्यांचे एजंट यांच्यामार्फत तक्रारदार जैन यांना फोन करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी केली.

आरोपीविरोधात गुन्हा : याबाबत तक्रारदार पारसकुमार केशुलाल जैन यांनी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडं तक्रार दिली होती. या चौकशी नंतर गुन्हे शाखेनं शांतीनगर पोलिसांकडं पाठवलेल्या पत्रानुसार शांतीनगर पोलिसांनी 30 सप्टेंबर रोजी चार आरोपींच्या विरोधात भादंवि कलम 420, 467, 471, 474, 406, 506(2), 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास ठाणे गुन्हे शाखेचे सपोनि निलेश सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा -

  1. Lonavala Gang Rape : पर्यटनाला आलेल्या मुलींचं अपहरण करून सामूहिक बलात्कार; दोन आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
  2. Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या
  3. Delhi Crime : दिल्ली महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येचा दोन वर्षानंतर उलगडा, तपासाकरिता पाठपुरावा करणारा 'तो' निघाला आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.