नवी मुंबई: पनवेल महानगरपालिकेने अलिकडे ताप तपासणी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र,काही नागरिक कोरोना संक्रमीत असू शकतात ते समोर आले नाही तर अनेकांना संक्रमित करू शकतात. म्हणून कोरोनाची लक्षणे असणा-यांनी तपासणी करणे आवश्यक आहे.
अशा तपासणीत जर पॉझिटिव्ह रूग्ण आढळला तर त्याला कोव्हिड रूग्णालयात म्हणजेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याला स्वॅब तपासणी दरम्यान त्यांना विलगीकरण करून ग्राम विकास भवन, खारघर, इंडिया बुल्स, बालाजी सिपनी व स्वस्थ , कळंबोली येथे ठेवणार आहे.
निगेटिव्ह रूग्ण हे शक्यतो घरी क्वारन्टाईन असतील. जसजसे रूग्ण वाढतील तशी ऐनवेळी धावपळ नको यासाठी पनवेल पालिका प्रशासनाने पूर्वनियोजन केले आहे. इंडिया बुल्स, बालाजी सिपनी प्रकल्पातील 1000 तयार फ्लॅट अधिग्रहीत केले असून, प्रशासनाने पुरेसे डॉक्टर्स व नर्सेस, रूग्णवाहिका सध्या कार्यान्वित केल्या आहेत व अधिका-यांना जबाबदारी वाटून दिली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोणताही नागरिक या संकटात सही सलामत राहील याची प्रशासन दक्षता घेत आहे.
तरी नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. अत्यावश्यक वस्तू घेण्यास गर्दी करू नये. घराबाहेर गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. जो भाग सील केला आहे तेथे कोणासही बाहेर येण्याजाण्यास मनाई आहे. सायंकाळी पाच नंतर संचार बंदी असल्याने रस्त्यावर व घराबाहेर दिसल्यास कारवाई होईल.