ठाणे - धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना ठाण्यामध्ये घडली. उल्हासनगर ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. राकेश साकेत असे जखमी तरुणाचे नाव आहे.
लोकलमधील गर्दीमुळे अनेक प्रवाशांना जीव गमवावे लागले आहेत. तर कित्येक गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना उल्हासनगर ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. लोकलमधील सकाळच्या गर्दीमध्ये राकेश साकेत हा तरुण कल्याणहून अंबरनाथला येणाऱ्या लोकलमध्ये चढला. मात्र, या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्याला गर्दीचा रेटा सहन न झाल्याने तो लोकलमधून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.
हे ही वाचा - मुंबई लोकल दगडफेक प्रकरण, साडेसहा वर्षांत ११८ घटनांमध्ये ११३ प्रवासी जखमी
जखमी राकेश हा उत्तर प्रदेशमधून एक्सप्रेसने कल्याण स्थानकात आला होता. तो आपल्या बहिणीकडे कल्याण स्थानकावरून उतरून अंबरनाथला राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे लोकलने जात होता. मात्र, या लोकलला गर्दी असल्याने विठ्ठलवाडी ते उल्हासनगर स्थानकादरम्यान तो लोकलमधून खाली पडला. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला ठाण्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा - गेल्या ६ वर्षात लोकलवर दगडफेकीच्या ११८ घटना; ११३ प्रवासी जखमी