कोल्हापूर - जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. आज(रविवार) दिवसभरात 28 नवीन रुग्णांची वाढ झाली असून आणखी एका महिला रुग्णाचा बळी गेला आहे. कोल्हापुरातील कोरोनाचा हा सहावा बळी ठरला आहे.
कोल्हापुरात मुंबई-पुण्यावरुन येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून त्यामुळे पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढायला लागली आहे. आज(रविवार) आढळलेल्या रुग्णांसह कोल्हापूरातील एकूण रुग्णांची संख्या 590 वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात दोघा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या 134 इतकी झाली आहे. त्यामुळे सध्या कोल्हापूरात एकूण 450 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज दिवसभरात एकूण 385 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 28 जणांना लागण झाली आहे. तर, उर्वरित सर्व अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज सर्वाधिक 10 रुग्ण हे कागल तालुक्यात वाढले आहेत.