ETV Bharat / state

रबाळे रेल्वे स्थानकासमोर अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर - ठाणे बेलापूर मार्गावर अपघात

दुचाकीवरून तोल गेल्याने पाठीमागे बसलेले संतोष चव्हाण (वय ४३) रस्त्यावर उजव्या बाजूला पडले. त्यावेळी मागून येणाऱ्या कंटेनरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नवी मुंबई
नवी मुंबई
author img

By

Published : Sep 30, 2020, 9:21 PM IST

नवी मुंबई - ठाणे बेलापूर मार्गावरील रबाळे रेल्वे स्थानकासमोर दुचाकीचा अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरून तोल गेल्याने पाठीमागे बसलेले संतोष चव्हाण (वय ४३) रस्त्यावर उजव्या बाजूला पडले. त्यावेळी मागून येणाऱ्या कंटेनरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रबाळे रेल्वे स्थानकासमोर अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

अपघातात दुचाकी चालक महादेव भाबळे (४०) हे जखमी झाले असून ते रस्त्यावर उजव्या बाजूला पडल्याने थोडक्यात बचावले. संबधित कंटेनर (आर.जे ५१ जीए ३७०७) आणि दुचाकी (एम.एच ०४ एफ.बी ५११९) पोलिसांनी ताब्यात घेतली असून कंटेनर चालकास अटक करण्यात आली आहे. ही घटना रबाळे रेल्वे स्थानकासमोर आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी दिली.

हेही वाचा - विस्थापितांच्या अडचणी : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने पालिका आयुक्तांना दिली ताबापत्राची 'फ्रेम' भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.