ठाणे - शहरातील कळवा परिसरामधील मेडीकलमध्ये पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यानेच गोळीबार केल्याचे समोर आले आहे.
एका मेडीकल स्टोअरमध्ये पहाटेच्या सुमारास चोर घुसला. तो चोरी करीत असताना दुकानामध्ये झोपलेल्या प्रेम सिंग उर्फ जितेंद्र सिंग राजपुरोहित या तरुणाने चोरीला विरोध केला. मात्र, चोरट्याने गोळीबार करून त्याठिकाणाहून पोबारा केला. यामध्ये प्रेम सिंगचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कळवा पोलीस गुन्हे शाखा या चोरट्याचा शोध घेत आहेत.
कळवा परिसरातील असलेल्या झोपडपट्टीमध्ये यापूर्वी देखील अनेकदा गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, या हत्या प्रकरणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.