ETV Bharat / state

Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत इमारतीचा भाग अंगावर कोसळून एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी..

author img

By

Published : Apr 10, 2022, 6:03 PM IST

भिवंडी शहरात इमारती कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. आज पहाटेही इमारतीचा भाग कोसळून शेजारील घरावर ( Bhiwandi Building Collapsed ) पडला. या दुर्घटनेत एकजणाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले ( One Died Two Injured Building Collapsed ) आहेत.

भिवंडीत इमारतीचा भाग अंगावर कोसळून एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी..

ठाणे : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका ( Bhiwandi Nizampur City Municipal Corporation ) हद्दीत इमारती कोसळण्याचे सत्र सुरुच ( Bhiwandi Building Collapsed ) असून, शहरातील गौसिया मस्जिदजवळ मैनुद्दीन अन्सारी यांच्या मालकीची तळ अधिक एक मजली इमारतीचा सज्जा शेजारील घरावर आज पहाटेच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत गुलशन सगिर अन्सारी (वय ४५ ) या महिलेच्या मृत्यू झाला ( One Died Two Injured Building Collapsed ) आहे. तर सगीर अन्सारी (वय ४५) मेहताब अन्सारी हे दोघे गंभीर झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात ( Sion Hospital Mumbai ) दाखल करण्यात आले आहे. दुपारपर्यत घटनास्थळी वैद्यकिय पथक, आपत्कालीन पथक, अग्निशमन दल, मनपा अधिकारी कर्मचारी मदतकार्य करत होते.

धोकादायक इमारती कोसळण्याच्या अनेक घटना : कामगारांचं शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी महापालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची संख्या ५८९ असून धोकादायक इमारतींची संख्या ४०० एवढी आहे. अशा प्रकारे शहरात सुमारे ९८९ इमारती धोकादायक असून, या सर्व इमारतींना महापालिकेकडून गेल्या पावसाळ्यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे या धोकादायक इमारतींना नोटीस देऊन देखील काही नागरिक आपल्या परिवाराचे स्थलांतर करत नसल्याने या धोकादायक इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 25 जण जखमी झाले आहेत .

दुर्घटनेत आतापर्यत 58 जणांचा मृत्यू : यापूर्वी देखील शहरात धोकादायक व अनधिकृत इमारती कोसळून नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 25 हजार कुटूंब राहत असून, सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर गेल्या चार वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत 58 जणांचा मृत्यू झाला होता. तर 69 जण जखमी झाले आहेत. शासनाने दाखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र पालिका प्रशासन कागदावर कारवाई झाल्याचे दाखवून इमारतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असल्याने पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

क्लस्टर योजना लाल फितीतच : भिवंडी शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आला असल्याने बांधकाम व्यवसायिकांनी शासकीय नियमांना तिलांजली देत छोट्या छोट्या जागेत वाटेल तशा मनमानी कारभार करत इमारती बांधल्या आहेत. भिवंडी , महापालिका हद्दीत बहुतांश इमारतींना प्रशासनाची परवानगी नसल्याने या अनधिकृत बांधकामांच्या गुणवत्तेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहेत. मात्र लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे या इमारतींना घरपट्टी मिळत असल्याने त्या आधारावर बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारती कमी किंमतींमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरजुंना विकल्या आहेत. धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून क्लस्टर योजना लाल फितीत प्रलंबीतच राहिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.