ETV Bharat / state

मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात; चालक ठार, दोन गंभीर - भरधाव कारचा अपघात

चालकाचा कारवरून ताबा सुटल्याने कार महामार्गावरील दुभाजकावरून उडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बसवर जाऊन जोरदार आदळली. या भीषण अपघातात कारच्या चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमीमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

Speedy Car crashes to bus
मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात;
author img

By

Published : Jul 15, 2020, 7:58 AM IST

Updated : Jul 15, 2020, 8:37 AM IST

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या मानकोली नाका जवळ मंगळवारी रात्री एका इनोव्हाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

इनोव्हा कार (MH 04 FR 5516) ही भरधाव वेगाने मंगळवारी रात्रीच्या सुमाराला मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचा कारवरून ताबा सुटल्याने कार महामार्गावरील दुभाजकावरून उडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बसवर जाऊन जोरदार आदळली. या भीषण अपघातात कारच्या चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमीमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होत, त्यांनी जखमींना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करीत चालकाचा, मृतदेह भिवंडी येथील ऑरेंज हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात

अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले होते. ते बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने पोलिसांना त्यांची नावे समजू शकली नाही. मात्र कार मधील चालकासह प्रवासी नाशिकचे रहिवाशी असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. तर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल केल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

Last Updated : Jul 15, 2020, 8:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.