ठाणे - 'व्हॅलेंटाईन दिना’च्या दिवशी लग्न करुन तो क्षण अविस्मरणीय ठेवण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. यावर्षी या दिवशी ठाणे जिल्ह्यातील 35 जोडप्यांनी नोंदणी विवाहासाठी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंद केली होती. यामध्ये कल्याण आणि बदलापूर येथील जोडप्यांची संख्या अधिक आहे.
हेही वाचा - 'राज्यात घडणाऱ्या घटनांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनीच करायला हवा'
‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस जगभर प्रेमाचा दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला आकर्षक भेटवस्तू देऊन हा दिवस अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतो. याच दिवसाच्या निमित्ताने अनेक जोडपी लग्नाच्या बेडीत अडकून हा दिवस अधिक अविस्मरणीय केल्याची माहिती ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाकडून मिळाली. यंदाच्या व्हॅलेंटाईन दिनाला विवाह करण्यासाठी अनेक जोडप्यांनी नोंदणी केल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी विवाह नोंदणी कार्यालयाचे अधिकारी अनिल गायकवाड यांनी दिली. 14 फेब्रुवारी 2018 ला 33 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला होता. 2019 ला एकूण 50 जोडप्यांचे नोंदणी विवाह पार पडले होते.
हेही वाचा - टेलिफॉन ऑपरेटर कंपन्या 'गॅस'वर; दूरसंचार विभागाने 'हे' दिले आदेश