ठाणे - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत असताना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील २५ आदिवासी पाडे वस्त्या वीज पुरवठा रस्ते पाण्यापासून वंचित आहेत या वस्त्यांकडे शासन लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही त्यामुळे वर्षानुवर्ष डोंगर दऱ्यातील दगड मातीच्या कच्च्या रस्त्यावरुन येजा करणे हेच या येथील आदिवासींच्या नशिबी आहे Amrut festival of freedom अनेक योजना आदिवासी विकासासाठी असल्या तरी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या योजना प्रभावीपणे आदिवासी भागात राबवित नसल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आदिवासी पाड्यांवर रस्ते नाहीत वीज आली नाही अशी माहिती सचिव खोडका यांनी दिली वाडीवरील बहुतांशी आदिवासी कष्टकरी मजूर आहेत उपजीविके पुरती शेती करुन मजुरीसाठी तो आजुबाजुची गावे तालुक्याच्या ठिकाणी जातो रोज कमवून त्यातून मिळणाऱ्या पैशातून उपजीविका करायची हे या भागातील आदिवासींचे दैनंदिन जीवन आहे
खडतर रस्त्याने रोजचा प्रवास आदिवासी पाड्यांवर शाळा नसल्याने मुलांना परिसरातील शाळांमध्ये जावे लागते वाडीपासून ते शाळेत जाण्यासाठी मुलांना कच्चा डोंगर उताराचा रस्ता पावसाळयात दुथडी वाहत असलेले ओहोळ शेताचे पऱ्हे पार करुन जावे लागत असतानाच यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यत ४ नागरिक पुराच्या पाण्यात वाहून गेली विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेत या रस्त्यांवरुन येजा करताना सरपटणारे जंगली प्राण्यांची भीती असते रात्रीच्या वेळेत वाडीत कोणी आजारी पडला तर त्याला डोली करुन गाव परिसरातील आरोग्य केंद्र ठिकाणी न्यावे लागते असे खोडका यांनी सांगितले
तरीही देशभक्तीचा जागर कायम एकीकडे अनेक आदिवासी गावपाड्यात शासनाच्या मूलभूत सुविधा गेल्या ७५ वर्षापासून पोहचू शकल्या नाही अशातही स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवांतर्गत येणाऱ्या मोहिमेत आदिवसी बांधवांची देशभक्ती पर जागर दिसून आला आज बहुतांश आदिवासी पाड्यात श्रमजीवी संघटनेच्या वतीने शेकडो आदिवसी बांधव बांधवानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चिखलाचे रस्ते तुडवत हातात तिरंगा झेंडा घेऊन देशभक्तीची यात्रा काढली होती
अर्थसंकल्प तरतुदीमधून गाव पाडयातविकासकामे होणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने नागरी सुविधांपासून वंचित आदिवासी वाड्यांमध्ये सुविधा द्याव्यात अशी मागणी खोडका यांनी केली सुविधांपासून वंचित आदिवासी पाड्यांच्या नियंत्रक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना या वाड्यांमध्ये सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत अर्थसंकल्प तरतुदीमधून ही कामे केली जातील अशी माहिती शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांनी सचिव खोडका यांना दिली
या आदिवासी गाव पाड्यात रस्ता वीज पोह्चलीच नाही साकडबाव तळ्याची वाडी अघई ठाकुरवाडी बोरशेती लोभी पोढ्याचा पाडा वेहलोंडे सापटेपाडा अस्नोली तईचीवाडी कोठारे वेटा फुगाळे वरसवाडी अजनूप दापूरमाळ शिरोळ सावरकुट उंभ्रई कातकरीवाडी वसरस्कोळ कातकरी वाडी मोहिली माळीपाडा मोखावण राड्याचापाडा टेंभा आंबिवली डोंळखांब जवळील गुंडे हद्दीतील भितारवाडी चाफेवाडी कोठेवाडी वांद्रे दोडकेपाडा अलनपाडा आदिवली पाथरवाडी पिवळी नळाचीवाडी साकुर्लीवाडी या आदिवासी गाव पाड्यात रस्ता वीज पोहचल्याच नाहीत
हेही वाचा CM Met MLA Anil Babar नुकसानीच्या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही मुख्यमंत्री