ठाणे - दरवर्षी पाणीकपातीमुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना यंदाचा उन्हाळा सुसह्य होणार आहे. जिल्ह्यातील विविध शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीकपात लागू होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात ( No Water Shortage Barvi Dam ) आले. मात्र, यंदाचा उन्हाळा पाहता एप्रिल आणि मे महिन्यात नागरिकांच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
धरणात ५४.६६ टक्के पाणी साठा -
बारवी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ३३८.८४ दशलक्ष मीटर एवढी आहे. तर आजच्या घडीला १८५.२० दशलक्ष मीटर पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजे आजही धरणात ५४.६६ टक्के पाणीसाठा असून, गेल्या आठवड्यात १८९.९४ दशलक्ष मीटर पाणीसाठा धरणात होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसही धरणात पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने अद्याप पाणीकपात जाहीर केलेली नाही. तसेच, एप्रिल आणि मे महिन्यातही ती जाहीर होण्याची शक्यता जवळपास नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
परिणामी उन्हाळ्याच्या उर्वरित दोन महिन्यांतही सध्या मिळत असलेला पाणीपुरवठा असाच सुरु राहणार आहे. त्यामुळे बारवी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांना सध्या तरी पाणीटंचाई सहन करावी लागणार नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Ujani Dam Water Storage : उजनी धरणात यंदा 65 टक्के पाणीसाठा शिल्लक; पहा पुणे जिल्ह्यातील अन्य धरणांची स्थिती