ETV Bharat / state

स्वातंत्र्यकाळापासून 'या' गावात पक्का रस्ताच नाही, ग्रामस्थ न्यायालयीन लढा उभारण्याच्या तयारीत - Thane district news

शहापूरपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खरीवली गावात जाणारा एकमेव रस्ता असून स्वातंत्र्य काळापासून तो रस्ता कच्चाच आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी करत आहेत.

रस्ता
रस्ता
author img

By

Published : Aug 11, 2021, 9:14 PM IST

Updated : Aug 11, 2021, 10:33 PM IST

ठाणे - शहापूरपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खरीवली गावात जाणारा एकमेव मुख्य रस्ता असून तो कच्चा रस्ता असल्याने बाराही महिने त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे वाहनामुळे एकाद्याच्या अंगावर चिखल उडल्यास वादावादी होते. म्हणून ग्रामस्थांनी न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर साचलेले असते व इतर वेळी भातसा कॅनलचे पाणी साचते यामुळे बाराही महिने हा रस्ता चिखलमयच असतो.

रस्ता

गावात जाण्यासाठी स्वातंत्र्यापासून रस्ताच नाही

एकीकडे शहापूर तालुक्यातील गाव, खेड्या-पाड्यात अतिदुर्गम भागात बहुतांश रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र, शहापूरपासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या खरीवली गावातील नागरिकांना गावात जाण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून रस्ताच नसल्याने पंचायत होऊन बसली आहे. 70 घरांचे खरीवली गाव असून 350 च्या सुमारास लोकसंख्या आहे. या गावात कुणबी, आदिवासी, बौद्ध, वारली समाजाचे बांधव राहत आहेत. मात्र, गावात जाण्यासाठी नागरिक ज्या रस्त्याचा वापर करत आहेत. ती जागा एका खासगी मालकी हक्काची असल्याने गावातील स्थानिक राजकारणामुळे तिसऱ्या पिढीपासून जागा मालकाने पूर्ण गावाला वेठीस धरले असून हा मालक गावात जाणारा रस्ताच करून देत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

जागा मालकाच्या कुटुंबातील सदस्याला उपसरपंचही केले, मात्र सतत घूमजाव

खरीवली गावातील नागरिकांना गावात जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून वर्षांपासून अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी जागा मालकाशी बैठक घेऊन रस्ता व्हावा यासाठीही वारंवार प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे जागा मालकाच्या अटीशर्यती ही मान्य केल्या आहेत. एक वेळ तर जागा मालकाच्या कुटुंबातील सदस्याला उपसरपंचही केले होते. तर स्वतःच्या फायद्यसाठी जागा मालकाने रस्ता देण्यासाठी अनेक वेळ गावकऱ्यासह लोकप्रतिनिधींना होकारही दिला. पण, बैठक संपताच घूमजाव करत जागा मालक रस्ताला नकार देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुकाभर गावाची रस्त्यामुळे बदनामी

गावात कुणी आजारी पडले तर गावापासून लांब असलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत त्या रुग्णाला उचलून न्यावे लागते. तर शाळकरी मुलांना शाळेत जातांना चिखलातून वाट काढत जावे लागते. गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले किंवा कोणता ही सुख दुःखाचा कार्यक्रम असला. तर त्यावेळी बाहेरील पाहुण्यांना गावापर्यंत जाण्यासाठी पायीच चिखलाची वाट तुडवत जावे लागते. यामुळे पाहुणे अक्षरशः गावातील नागरिकांना तुमच्या गावात पुन्हा पाय ठेवणार नसल्याचे सांगत गावाच्या रस्त्या विषयी तालुकाभर प्रचार करून गावाची बदनामी करत असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले.

गावपातळीवरील भानगडीमुळे रस्ता रखडला

खरीवली गावकऱ्यांनाही वाटत आहे की, आपल्या गावाचा रस्ता ही तालुक्यातील इतर गावांसारखा झाला पाहिजे. पण, गावातील एकाच कुटुंबाने गावकऱ्यांना वेठीस धरल्यामुळे त्यांचे पूर्ण प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. गावात होत असलेल्या अंतर्गत गावपातळीवरील भानगडी व गावपातळीवरील होत असलेले राजकारण या सारख्या गोष्टींमुळे पूर्ण गावाला वेठीस धरले जात असून स्वातंत्र्य काळापासून तालुक्यातील खरीवली हे गाव चकाचक रस्त्यापासून आतापर्यंत मुकले आहे. तर या रस्त्याच्या लढाईसाठी खरीवली गावातील नागरिक, तरुण एकत्र येऊन ही लढाई लढण्यासाठी आम्ही गावकरी लोक न्यायालयात जाऊन लढणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा, फरार ठकास उत्तर भारतातून अटक

Last Updated : Aug 11, 2021, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.