ETV Bharat / state

Bird Flu : वेहळोली गावातून बर्ड फ्लू हद्दपार, 'ही' लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी - बर्ड फ्लू म्हणजे काय?

शहापूरच्या वेहळोली गावातून बर्ड फ्लू हद्दपार ( no bird flu in thane ) करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे, असे असले तरी गाफील न राहता प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन करत वेहळोलीसह एक किमी परिघातील परिसर पुन्हा पिंजून काढला आहे. यावेळी कुठेही कोंबड्या सापडल्या नाहीत. त्यामुळे निर्जंतुकीकरणानंतर पुढचे पाऊल म्हणून आता परिसरातील ६० पाळीव डुकरांच्या रक्ताचेही नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

no bird flu in thane
बर्ड फ्लू हद्दपार
author img

By

Published : Feb 22, 2022, 5:45 PM IST

ठाणे - शहापूरच्या वेहळोली गावातून बर्ड फ्लू हद्दपार ( no bird flu in thane ) करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे, असे असले तरी गाफील न राहता प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन करत वेहळोलीसह एक किमी परिघातील परिसर पुन्हा पिंजून काढला आहे. यावेळी कुठेही कोंबड्या सापडल्या नाहीत. त्यामुळे निर्जंतुकीकरणानंतर पुढचे पाऊल म्हणून आता परिसरातील ६० पाळीव डुकरांच्या रक्ताचेही नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच येथील रहिवाशांपैकी कुणाला तापाची लक्षणे आळल्यास त्यांच्यांही रक्ताचे नमुने तातडीने घेण्याच्या सुचना संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्यात आले, असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

8 हजार कोंबड्या केल्या नष्ट -

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील ३०० कोंबड्या अचानक दगावल्याचे १७ फ्रेब्रुवारीला निदर्शनास आले होते. बर्ड फ्लूने या कोंबड्या दगावल्याचे अहवालात निष्पन्न होताच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आधिसुचना काढत वेहळोलीचा एक किलोमीटर त्रिज्येतील परिसर संसर्ग बाधित म्हणून घोषीत केला. त्यानंतर तातडीने कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या त्यांच्यामार्फत शिघ्रकृती दल तयार करून त्यांच्यामार्फत कोंबड्या व अंडी, खाद्य नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार बाधित क्षेत्रातील सहा पोल्र्टी फार्ममधील १५ हजार ६०० ब्रॉयलर, अंडी देण्यायोग्य ७ हजार ९६२ कोंबड्या, २० बदके, ९८० हून अधिक अंडी, पिल्ले, खाद्य नष्ट करण्यात आले आहे. या सर्व कोंबड्यांना संसर्ग नव्हता. पण बर्ड फ्लूला हद्दपार करण्यासाठी त्यांना नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

'कामगारांच्या संपर्कात आरोग्य विभाग'

आजच्या घडीला या परिसरातील कोंबड्यांची सर्व खुराड रिकामी झाले असून वेळीच पाऊले उचलल्याने जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शुक्रवारी कोंबड्या, अंडी नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच सर्व पोल्र्टी फार्म, चिकन सेंटर बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही कुठे चोरी छुपे व्यवहार सुरू आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी विशेष पथकाद्वारी रविवारी वेहळोली गावासह परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी कुठेही कोंबड्या सापडल्या नाहीत. पण हा संसर्ग माणसांपर्यंत पोहचला की नाही याची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी पोल्र्टी फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या संपर्कात आरोग्य विभाग आहे. यशिवाय पाळीव ६० डुकरांचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य सेवकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून कुणीही संशयीत आढळल्यास तत्काळ रक्ताचे नमुने घेण्याच्या सुचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

घाबरू नका, पण सतर्क रहा -

जिल्ह्यात कुठेही सध्या बर्ड फ्लू नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. पण सतर्क राहणे गरजेचे आहे. कुठेही बर्ड फ्लू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

बर्ड फ्लू म्हणजे काय? (What is bird flu)

हा एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू आहे. जे विषाणूजन्य संसर्ग पसरवून पक्ष्यांना संक्रमित करतात. दुसर्‍या भाषेत, हा रोग इन्फ्लूएंझा प्रकार ए विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. जे पक्षी आणि मानव दोघांनाही आपल्या कवेत घेऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की सर्वात प्रसिद्ध एव्हीयन इन्फ्लूएंझा (H5N1) बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांसह मानवांचाही मृत्यू होऊ शकतो.

बर्ड फ्लू माणसांमध्ये कसा पसरू शकतो?

जेव्हा व्यक्ती संक्रमित कोंबडी किंवा इतर पक्ष्यांच्या जास्त संपर्कात असते तेव्हा ही समस्या उद्भवू शकते.
जेव्हा व्यक्ती बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांचे मांस (कच्चे मांस) खातात तेव्हा ही समस्या उद्भवू शकते.
कोंबडी किंवा पक्षी जिवंत असो वा मेला, हा विषाणू डोळे, नाक किंवा तोंडातून माणसांमध्येही पसरू शकतो.
ही समस्या त्या व्यक्तीने संक्रमित पक्षी साफ केली तरीही होऊ शकते.
ही समस्या संक्रमित पक्ष्याच्या निपिंगमुळे देखील होऊ शकते.

बर्ड फ्लूची लक्षणे

  • ताप येणे.
  • स्नायूंमध्ये वेदना जाणवणे.
  • सतत वाहणारे नाक.
  • खोकल्याची समस्या.
  • खालच्या ओटीपोटात वेदना जाणवणे.
  • डोकेदुखीचा त्रास होतो.
  • डोळ्यांची लालसरपणा (नेत्रश्लेष्मलाशोथ)
  • जुलाब होणे.
  • मळमळ किंवा उलट्यासारखे वाटणे.
  • घशात सूज येण्याची समस्या.

बर्ड फ्लूचे वैद्यकीय उपचार

  • ही समस्या अँटीव्हायरल औषधांद्वारे प्रगती करण्यापासून रोखली जाते.
  • डॉक्टर व्यक्तीला विश्रांती घेण्याचा सल्ला देतात.
  • या समस्येदरम्यान, व्यक्तीने निरोगी आहार घेतला पाहिजे.
  • एखाद्याने अधिक द्रवपदार्थ घेतले पाहिजेत.
  • बर्ड फ्लू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, असे सिद्ध करणारे एकही प्रकरण आतापर्यंत समोर आलेले नसले, तरी डॉक्टर रुग्णाला दूर राहण्याचा सल्ला देतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.