ETV Bharat / state

निजामपूर पोलीस ठाण्याच्या उभारणीच्या चौदा वर्षानंतरही बांधकाम अपूर्णच; सत्ताधारीही मुक्या, बहिऱ्यांच्या भूमिकेत

author img

By

Published : Jul 4, 2019, 8:32 PM IST

भिवंडी शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पोलीस ठाण्यास विरोध करण्यासाठी जातीयवाद्यांनी दंगल घडवून आणली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्या जागी निजामपूर पोलीस ठाणे तातडीने बांधण्याचे आदेश सरकारला दिले. मात्र, 14 वर्ष उलटली तरी या काळात भाजप-शिवसेना युती सरकारने पोलीस ठाणे बांधले नाही.

निजामपूर पोलीस ठाण्याच्या ईमारतीचे अपुर्ण बांधकाम

ठाणे - भिवंडी शहरातील ज्या पोलीस ठाण्याच्या उभारणीसाठी 14 वर्षापूर्वी भाजप-सेनेच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन, मोर्चे काढले त्याला 14 वर्षाचा कालावधी उलटूनही पोलीस ठाणे उभारणीचा वनवास सुरूच आहे. यामुळे पोलीस ठाण्याच्या उभारणीचा प्रश्न जैसे थे असल्याने सत्ताधारी मुक्या आणि बहिऱ्यांच्या भूमिकेत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

nijampur-police-station-buildings-construction-is-still-incomplete-in-thane
निजामपूर पोलीस ठाण्याच्या ईमारतीचे अपूर्ण बांधकाम

भिवंडी शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पोलीस ठाण्यास विरोध करण्यासाठी जातीयवाद्यांनी दंगल घडवून आणली होती. या घटनेला शुक्रवारी 5 जुलै रोजी 14 वर्षे पूर्ण होतील. तसेच, या दंगलीत दोन पोलिसांची हत्या देखील करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यात प्रचंड खळबळ माजली होती. त्यावेळी सेना-भाजपने आंदोलन केले होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्या जागी निजामपूर पोलीस ठाणे तातडीने बांधण्याचे आदेश सरकारला दिले. मात्र 14 वर्ष उलटली, तरी या काळात भाजप-शिवसेना युती सरकारने पोलीस ठाणे बांधले नाही, त्यामुळे पोलीस व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडी शहरातील निजामपुरा पोलीस ठाण्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे कॉटरगेट, कसाईवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचे काम तत्कालीन भिवंडी पोलीस उपायुक्त आर. डी. शिंदे यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात हाती घेतले होते. मात्र या बांधकामाला स्थानिक 'रजा अकॅडमी' या कट्टरपंथी संघटनेने तीव्र आक्षेप घेत विरोध दर्शवून 5 जुलै 2006 रोजी पोलिसांवर दगडफेक करून दंगल घडवून आणली. या दंगलीत तत्कालीन पोलिस उपायुक्त आर. डी. शिंदे यांच्यासह 39 पोलीस जखमी झाले होते. त्याच रात्री एका जमावाच्या टोळक्याने पाच एसटी बसची जाळपोळ करून बाळासाहेब गांगुर्डे व रमेश जगताप या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निर्दयपणे ठार केले. त्यानंतर या दंगलीबाबत शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी आरोप असलेल्या 18 दंगलखोरांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र 14 वर्षानंतर ही पोलीस ठाण्याच्या बांधकामास अद्याप सुरुवात झाली नाही.

सध्या या जागेत वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केलेल्या रिक्षा, मोटरसायकली तसेच जप्त केलेली वाहने व इतर सामान ठेवण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षापासून राज्यात भाजप-शिवसेना युतीचे राज्य आहे. मात्र, पोलीस ठाणे उभारण्यासंदर्भात स्थानिक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांपैकी कोणीही शब्द काढत नाही. पावसाळ्यात पोलीस ठाण्यात पाणी शिरत असल्याने गेल्या दीड वर्षापासून हे पोलीस ठाणे हलवून भिवंडी महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर अडगळीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. तर, नविन पोलीस ठाण्याच्या उभारणीचा मुहूर्त कधी निघतो याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Intro:किट नंबर 319

Body:निजामपूर पोलीस ठाण्याच्या उभारणीचे चौदा वर्ष उलटूनही वनवास संपेना; सत्ताधारीही मुक्या , बहीऱ्यांच्या भूमिकेत

ठाणे :- रामायणात आपण पहिलं की, रामाला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला होता, वनवास भोगून आल्यानंतर त्यांनी पुन्हा राज्य कारभार चालवला, मात्र भिवंडी शहरातील ज्या पोलीस ठाण्याच्या उभारणी साठी 14 वर्षीपूर्वी भाजप - सेनेच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन , मोर्चे काढली होती, मात्र 14 वर्षाचा कालावधी उलटूनही पोलिस ठाणे उभारणाचा वनवास संपला नाही, यामुळे पोलीस ठाण्याच्या उभारणीचा प्रश्न जैसे थे असल्याने सत्ताधारी मुक्या आणि बहिऱ्यांच्या भूमिकेत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे,

खळबळजनक बाब म्हणजे भिवंडी शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पोलीस ठाण्यास विरोध करण्यासाठी जातीयवाद्यांनी दंगल घडवली होती, या घटनेला शुक्रवारी 5 जुलै रोजी 14 वर्षे पूर्ण होतील, तसेच या दंगलीत दोन पोलिसांच्या हत्या देखील घडवल्या होत्या , या घटनेमुळे राज्यात प्रचंड खळबळ माजली होती,
त्यावेळी सेना-भाजपने आंदोलन केले होते, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यात जागी निजामपूर पोलीस ठाणे तातडीने बांधण्याचे आदेश सहा वर्षापूर्वी सरकारला दिले आहेत, मात्र 14 वर्ष उलटली . तरी या काळात भाजप-शिवसेना युती सरकारने पोलीस ठाणे बांधले नाही, त्यामुळे पोलीस व कायदाप्रिय नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे,

भिवंडी शहरातील निजामपुरा पोलीस ठाण्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरण्याच्या घटना घडत होत्या, त्यामुळे कॉटरगेट , कसाईवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचे काम तत्कालीन भिवंडी पोलीस उपायुक्त आर डी शिंदे यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात हाती घेतले होते , मात्र या बांधकामाला स्थानिक रजा अकॅडमी या कट्टरपंथी संघटनेने तीव्र आक्षेप घेऊन विरोध दर्शवून 5 जुलै 2006 रोजी पोलिसांवर दगडफेक करून दंगल घडवून आणली, या दंगलीत तत्कालीन पोलीस उपायुक्त आर डी शिंदे यांच्यासह 39 पोलीस जखमी झाले होते, तर त्या रात्री एका जमावाच्या टोळक्याने पाच एसटी बसची जाळपोळ करून बाळासाहेब गांगुर्डे वर रमेश जगताप या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निर्दयपणे ठार केले होते, त्यानंतर या दंगलीबाबत शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झाले, त्यापैकी आरोप असलेल्या 18 दंगलखोरांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे , मात्र 14 वर्षानंतर ही पोलीस ठाण्याच्या बांधकामास अद्यापही सुरुवात झाली नाही, या जागेत वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केलेल्या रिक्षा , मोटरसायकली तसेच जप्त केलेली वाहने व इतर सामान ठेवण्यात आले आहे, गेल्या पाच वर्षापासून राज्यात भाजप शिवसेना युतीच्या राज्य आहे , मात्र पोलिस ठाणे उभारण्यासंदर्भात स्थानिक राजकीय पक्षांचे पुढारी कोणीही ब्र शब्द काढत नाही , पोलीस ठाण्यात पावसाळ्यात पाणी शिरत असल्याने गेल्या दीड वर्षापासून हे पोलीस स्टेशन हलवून भिवंडी महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर अडगळीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.