ठाणे NIA Raid In Thane : ठाण्यातील राबोडी परिसरात आज पहाटे एनआयएच्या धाडीमध्ये एका कुटुंबातील सर्वांची कसून चौकशी करण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या चौकशी दरम्यान एका व्यक्तीचा मोबाईल अधिक तपासणीसाठी नेण्यात आला. महाराष्ट्रात अशा 44 ठिकाणी एनआयएने छापे टाकून सर्च ऑपेरेशन हाती घेतलं आहे.
संशयित कुटुंबाची केली तपासणी : आज पहाटे ठाण्यातील राबोडी परिसरात एनआयएच्या टीम्सने जोरदार छापेमारी करत संशयित कुटुंबाच्या घराची कसून तपासणी केली. राबोडी परिसरामधील चांदिवला या इमारती मधील पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या बापे कुटुंबाच्या घरात एनआयएकडून छापे टाकण्यात आले. पहाटे चार वाजता सुरू झालेले या धाडीमध्ये संपूर्ण कुटुंबाची कसून चौकशी करण्यात आली. तर पहाटे चार वाजता सुरु झालेली ही चौकशी तब्बल चार तास चालली.
चौकशीसाठी मोबाईल घेतला ताब्यात : बापे कुटुंबातील एक असलेल्या असजत बापे याने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या टीमने त्यांच्या कुटुंबाची कसून चौकशी केली. एनआयएच्या धाडी दरम्यान पोलिसांना आक्षेपार्ह असं काहीच मिळालं नसल्याचा दावा त्यानी केलाय. बापे कुटुंबियातील सर्व सदस्यांचे मोबाईल आणि त्यातील डेटा देखील तपासला असल्याचं त्यानं सांगितलं. या कुटुंबातील सदस्य असलेले अंजुम बापे (Anjum Bape) हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. त्यांचा मोबाईल जप्त करून पुढील तपासणीसाठी देण्यात आल्याचा दुजोरा असजत याने दिला. असजत बापे हा अंजुम बापे यांचा मुलगा आहे. आपल्या वडिलांचा मोबाईल एनआयएच्या लोकांनी घेऊन गेल्याचा त्यांनी आरोप केला. असजत बापे हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याने आपल्या कुटुंबीयांनी कोणतेही चुकीचं काम केलं नसल्याचा दावा केलाय. आज पहाटे पार पडलेल्या या धाडीवेळी, चार ते पाच जण एनआयए आणि ATS च्या अधिकाऱ्यांसोबत जवळपास दहा ते पंधरा स्थानिक पोलीस देखील सामील झाले होते.
हेही वाचा -