ETV Bharat / state

NIA Raid In Thane : इसिस दहशतवादी संघटनेच्या आणखी एका संशयित दहशतवाद्याच्या एनआयएने आवळल्या मुसक्या - दहशतवाद्यांना भाड्याने खोली

भिवंडी परिसरातील पडघा बोरीवली गावातून एनआयएने एका संशयित दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकिब नाचण असे या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. अकिबने दहशतवाद्यांना भाड्याने खोली देत त्यांना आर्थिक मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NIA Raid In Thane
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 5, 2023, 2:05 PM IST

Updated : Aug 5, 2023, 6:50 PM IST

ठाणे : राष्ट्रीय तपास संस्थेच्या गुप्तचर यंत्रणेच्या (NIA ) पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्हातील भिवंडी तालुक्यातील पडघा - बोरिवली गावात छापेमारी केली. या छापेमारीत आणखी एका 'इसिस' दहशतवादी संघटनेच्या संशयित आरोपाला अटक केली आहे. अकिब नाचण असे अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. गेल्याच महिन्यात याच परिसरातून शरजील शेख, ( वय 35) आणि झुल्फिकार अली बडोदावाला (वय, 36) या दोघांना अटक अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे अकिबने भिवंडी तालुक्यातील पडघा - बोरीवलीमध्ये या दहशतवाद्यांना भाड्याने खोली देऊन आर्थिक मदत केल्याचे उघड झाले आहे.

  • In its sixth arrest in the ISIS Maharashtra module case, the National Investigation Agency (NIA) today took into custody one Aakif Ateeque Nachan for his involvement in the fabrication and testing of Improvised Explosive Devices (IED) for the commission of terrorist acts and… pic.twitter.com/7ATEtGrHQN

    — ANI (@ANI) August 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दहशतवाद्यांना भाड्याची खोली देत आर्थिक मदत : सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान अकिबला ताब्यात घेण्यात आले आहे. अकिबला यापूर्वीही गुजरात एटीसने अटक केली होती. यापूर्वी अटक केलेल्या शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना भाड्याची खोली देऊन त्यांना अकिब आर्थिक मदत करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

एनआयएची माहिती - NIA ने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून एका व्यक्तीला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी गटाचा भाग असल्याच्या आरोपाखाली अटक केली. आकीफ अतीक नाचन हा आरोपी या प्रकरणात अटक झालेला सहावा व्यक्ती आहे. दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आणि इतर दोन दहशतवादी कारवायांसाठी लपण्याची व्यवस्था करण्यासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनावणे आणि चाचणीमध्ये त्याचा कथित सहभाग होता, असे एनआयएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

तरुणांची भरती केल्याचे उघड : सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एनआयए अधिकाऱ्यांच्या तपासात अटक केलेले यापूर्वीचे चारही दहशतवाद्यांनी त्यांच्या साथीदारांसह इसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले होते. या चौघांनी आयइडी आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले असून रोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील आपापसात वाटून घेतली होती. यात आयईडी बनवणे आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे, आदी माहिती असल्याचेही सूत्रांनी यावेळी सांगितले आहे. त्याशिवाय त्यांच्या परदेशस्थित इसीसच्या हँडलर्सच्या निर्देशानुसार आरोपींनी बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही एनआयएने म्हटले आहे.

आरोपीच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससह इसिसशी संबंधित कागदपत्रे : एनआयए पथकाने 28 जून 2023 रोजी नोंदवलेल्या आयसीआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी संशयातांच्या घरांची झडती घेण्यात आली होती. त्यावेळीही एनआयए पथकाने आरोपींच्या घरांची झडती वेळी काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक कागदपत्रे आदी अनेक गुन्ह्यात वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले होते. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे इसिस या दहशतवादी संघटनेशी सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे समोर आल्याचे सांगण्यात आले.

भिवंडी शहर देशविघातक कारवायांसाठी होत आहे कुप्रसिद्ध : मागील वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक आणि दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. शिवाय मुंब्रा भागातूनही गेल्या दोन वर्षात संशयिताना ताब्यात घेऊन अटक केली होती. तर 2014 साली कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये भरती झाले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आजही देशविघातक कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा -

  1. Adnanali sent to custody : इसिसशी संबंध असल्याच्या आरोप, अदनानलीला सुनावली एनआयए कोठडी
  2. Anti ISIS operation In Bhiwandi: 'आयसिस' दहशतवादी संघटनेच्या दोघांना भिवंडी नजीकच्या पडघा-बोरिवलीतून अटक
  3. Pune ISIS Module : पुण्यातील दहशतवाद्यांचे इसिसशी कनेक्शन, 'ही' संघटना कशी काम करते?

Last Updated : Aug 5, 2023, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.