ETV Bharat / state

नवी मुंबईत कोरोना आकडा 108 वर, आणखी 5 कोरोनाबधितांची वाढ...

नवी मुंबई शहरात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत आहे. आजही दिवसभरात नवी मुंबईत 5 रुग्णांची भर पडली असून, सद्यस्थितीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 108 इतकी झाली आहे.

New Mumbai corona patients raise to 108
नवी मुंबईत कोरोना आकडा 108 वर
author img

By

Published : Apr 25, 2020, 10:18 PM IST

नवी मुंबई - शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. नवी मुंबईत दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत आहे. यामुळे नागरिक व प्रशसनाची चिंता वाढत आहे. आजही दिवसभरात नवी मुंबईत 5 रुग्णांची भर पडली असून, सद्यस्थितीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 108 इतकी झाली आहे.

नवी मुंबईत कोरोना आकडा 108 वर

नवी मुंबईत आतापर्यंत 119 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यामध्ये 108 नागरिक नवी मुंबईत राहणारे आहेत. तर उर्वरित 11 हे इतर भागातील होते. आतापर्यंत नवी मुंबई शहरात 1812 नागरिकांची कोव्हिड 19 ची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये 1116 इतक्या नागरिकांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली असून, 108 जण कोविड 19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 588 जणांचे कोविड 19 चे अहवाल येणे प्रलंबित आहे व 27 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.

25 एप्रिलला 5 जणांचे कोव्हिड 19 चे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये कोपरखैरणे येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आल्याने तिच्या 23 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वाशी येथील खासगी नर्सचे काम करणाऱ्या महिलेचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, संबंधित महिला चेंबुर येथे जाऊन, दोन रुग्णांना नर्सिंग सेवा देत होती. 21 एप्रिलपर्यत ही महिला मुंबईत बसने ये जा करत होती. 22 तारखेला महिलेला तापाची लक्षणे जाणवल्या नंतर स्वॅब चाचणी केली असता ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तसेच तुर्भे येथील 42 वर्षी व्यक्ती, कोपरखैरणे येथील 63 वर्षीय व्यक्ती, व घणसोली येथील 37 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तो भाग संपुर्णपणे निर्जंतुकीकरण करून प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.