ठाणे - महानगरपालिका हद्दीत कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे हे लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने एक मोठे पाऊस उचलले आहे. ठाणे मनपाची ग्लोबल हब बिल्डिंग या मोठ्या इमारतीत १ हजारापेक्षा जास्त खाटांचे हाॅस्पिटल तयार केले जात आहे. या हाॅस्पिटलमध्ये टेस्टिंग लॅब, डायलेसिस सेंटर, ॲाक्सिजन सेंटर या सारख्या सर्वच सुविधा एकाच ठिकाणी सुरू केल्या जाणार तर ४०० खाटा या व्हेंटिलटरसारख्या सुविधांनी सज्ज असणार आहेत.
आज या प्रस्तावित कोव्हिड सेंटर हाॅस्पिटलची पाहणी करण्याकरिता ठाणे जिल्हा पालकामंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आयुक्त विजय सिंघल आणि महापौर नरेश म्हस्के आले होते.