ठाणे - देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दरम्यान, राज्यातील काही मुख्य शहरांमध्ये रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. ठाण्यात गुरुवारी सर्वाधिक विक्रमी २६४ रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी मात्र रुग्णांचा आकडा ३६५ने वाढला आहे. वाढती रुग्णांची संख्या पाहता महानगरपालिका प्रशासनाने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
ठाण्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ५२ टक्के आहे. शुक्रवारी चार रुग्णांच्या मृत्यूसह आकडा २४९ वर गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३,७१६ एवढे रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. तर सक्रीय रुग्णसंख्या ३,४९१ एवढी आहे. शुक्रवारी कोरोनावर मात करून घरी गेलेल्या रुग्णांचा आकडा ११० एवढा आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत ४१ हजार २७१ लोकांच्या चाचण्या केल्या असून त्यापैकी ४१ हजार ५८ लोकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.
ठाण्यात शुक्रवारी ३६५ कोरोनाबाधितांची नोंद; चार जणांचा मृत्यू - कोरोना पेशंट ठाणे
ठाण्यात गुरुवारी सर्वाधिक विक्रमी २६४ रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी मात्र रुग्णांचा आकडा ३६५ने वाढला आहे. वाढती रुग्णांची संख्या पाहता महानगरपालिका प्रशासनाने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.