ETV Bharat / state

Girl Rape Case Thane : शेजारच्या नराधमाचा घरात घुसून बळजबरीने तरुणीवर बलात्कार - young man rapes young girl in Thane

शेजारी राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून शेजारच्याच नराधमाने बळजबरीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना कल्याण-पूर्व पिसवली परिसरात असलेल्या एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सागर गाडे असे बेड्या ठोकलेल्या नराधमाचे नाव आहे.

Girl Rape Case Thane
तरुणीवर बलात्कार
author img

By

Published : Jun 10, 2023, 5:37 PM IST

ठाणे : पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कल्याण शीळ मार्गावरील पिसवली गावात आपल्या मोठ्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहते. पीडितेच्या बहिणीचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडिता घरी एकटीच असायची. ही संधी साधत शेजारी राहणाऱ्या सागर याने तिची छेड काढण्यास सुरूवात केली. महिनाभरापूर्वीच सागरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र तिने आरडाओरड केल्याने तो तेथून पळून गेला. जाताना त्याने पीडितेला धमकवल्याने पीडिता भयभीत झाली होती.

नराधमाचे कुकृत्य : काही दिवसांनी नराधम सागरने तिला घरात एकटी पाहून पुन्हा तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच दिवशी वारंवार तिच्यावर बलात्कार केला. घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी पीडितेला दिल्याने ती घाबरली होती. त्यामुळे तिने याची वाच्यता कुठेच केली नाही. एक दिवस पीडिता घराबाहेर पडली असता आरोपीने भर रस्त्यात तिची छेड काढली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रसंग आपल्या मोठ्या बहिणीला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या बहिणीच्या पतीने नराधम सागरला याचा जाब विचारला असता त्याने व त्याच्या कुटुंबाने त्यांची माफी मागितली. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सागरने पीडितेच्या कुटुंबाला धमकावले.

आरोपीस पोलीस कोठडी: या घटनेनंतर पीडितेने धाडस करून मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. पोलिसांनी नराधम सागर विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ९ जून रोजी अटक करण्यात आली. आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली गेली. या गुन्ह्याचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहे.

हेही वाचा:

  1. Gujarat ATS Action : गुजरात एटीएसने आवळल्या चार संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या, एका महिलेचाही समावेश
  2. Stone pelting: अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक; 32 जण पोलिसांच्या ताब्यात, 12 जूनपर्यंत संचारबंदी
  3. Hyderabad Crime : विवाहित पुजाऱ्याने प्रेमसंबंधातून प्रेयसीची केली हत्या, जेसीबीने खोदून पोलिसांना शोधला मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.