ETV Bharat / state

Kalwa Hospital : मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या रुग्णालयातच मुलाच्या उपचारासाठी वयोवृद्ध आईची वणवण - मुलाच्या उपचारासाठी आईची वणवण

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण दगावण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तर दुसरीकडे याच रुग्णालयात मुलाच्या उपचारासाठी वयोवृद्ध आईची वणवण दिसून आली.

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
author img

By

Published : Aug 15, 2023, 10:18 PM IST

ठाणे : सतत होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमुळे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि तेथील रुग्णसेवा हा चर्चेचा विषय बनला आहे. केवळ तीन दिवसात 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देत असतानाच एका वयोवृद्ध मातेची आपल्या तरुण मुलाच्या उपचारासाठी धडपड चालू होती.

एक ते दीड लाख रुपयांची केली मागणी : कळवा रुग्णालयात याआधी या तरुणाचे दोन ऑपरेशन झाले होते. पण दोन्ही ऑपरेशन फेल गेल्याने त्याची जखम चिघळली. कळवा रुग्णालयात पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप वयोवृद्ध आईने केला आहे. पैसे नसल्याने गेले काही दिवस त्या रुग्णालयातच राहत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री रुग्णालयाचा दौरा करत होते. तर दुसरीकडे ही वयोवृद्ध माता आपल्या मुलासाठी दयेची भीक मागत होती. कळवा रुग्णाल्यात सगळे आलबेल असून उत्तम सेवा रुग्णांना मिळत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. परंतु एका गलिच्छ कोनाड्यात झोपलेली ही माय मात्र पाणवलेल्या डोळ्यांनी सर्वांकडे पाहत होती. कोणीतरी आपल्यावर दया करून आपल्याला न्याय द्यावा. मुलाला चांगले उपचार मिळावेत एवढीच माफक इच्छा या वयोवृद्ध आईची होती.

रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. येथील घाण आणि दुर्गंधी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला असून, डॉक्टर आणि इतर स्टाफच्या वागणुकीबद्दल न बोललेले बरे. गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नसल्याने ते सरकारी रुग्णालयात येतात. परंतु, येथे आल्यावर त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. अशा या रुग्णालयात तीन दिवसातच 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने हे रुग्णालय ठाणेकरांच्या चर्चेचा विषय बनला.

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एक वयोवृद्ध माता आपल्या मुलाच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे विनवणी करताना दिसली. खाली पडल्याने मुलाच्या कमरेला गंभीर इजा झाली होती. विदर्भातील वयोवृद्ध माता सध्या डोंबिवली येथे राहत असून, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने वृद्धाश्रमात राहत होती. पेंटिंगची छोटी-मोठी कामे करणारा 30 वर्षीय मुलगा एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीत राहतो. आईलाच मुलाकडे जाऊन त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी लागते. त्यातच लाईट बिल थकल्याने वीज देखील कापली असून अंधाऱ्या घरात मायलेक कसेबसे दिवस ढकलत आहेत.

हेही वाचा -

  1. Jito Hospital Incident: बिला अभावी पार्थिव शरीर देण्यास नकार; महापालिकेच्या जितो हॉस्पिटलचा प्रताप
  2. Kalwa Hospital Patients Death : कळवा रुग्णालयात आणखी चौघांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली रुग्णालयाला भेट
  3. Kalwa Hospital Patient Death Case: कळवा हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे थैमान; अश्रू.. हुंदके आणि टाहो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.