ठाणे - येत्या १७ मे ला मनसेच्या वतीने ठाण्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रसनेही पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
शेतकरी हितासाठी हेवे-दावे नाहीत; मनसेच्या शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादीचा पाठिंबा - आव्हाड
मनसेच्या वतीने शुक्रवारी दुपारी 02 वाजता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. गावदेवी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे असा हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे.

येत्या १७ मे ला मनसेच्या वतीने ठाण्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रसनेही पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली.
आव्हाड म्हणाले, मनसेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरत असतील तर, शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी कोणतेही हेवे दावे न करता या मोर्चात सहभागी होईल. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते उद्याच्या मोर्चात सहभागी होणार, फॅसिजमच्या विरोधात पक्ष विसरून आम्ही एकत्र येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मनसेच्या वतीने शुक्रवारी दुपारी 02 वाजता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. गावदेवी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे असा हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे.
या मोर्चात राज्याभरातील शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच या मोर्चात आठ ते दहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबही सहभागी होणार आहेत, अशी माहिती मनसेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली आहे .
गेल्या आठवड्यात ठाण्यात आंबे विक्रीचा स्टॉल लावल्यावरून भाजप आणि मनसेत राजकीय राडा झाला होता. या राड्यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलन छेडले आहे. याचाच भाग म्हणून १७ मे ला दुपारी एका मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात नाशिक, कोकण, पालघर, धुळे आदी भागातील शेतकरी सामील होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून मनसे काही प्रमुख मागण्या करणार आहेत.
Conclusion: