ETV Bharat / state

Jitendra Awhad : ४०० धर्मांतर झाल्याचे सिद्ध न केल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद - जितेंद्र आव्हाड यांचा इशारा - Awhad Aggression over Ghaziabad Conversion Case

गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा, येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड यांचा इशारा
author img

By

Published : Jun 8, 2023, 9:17 PM IST

Updated : Jun 8, 2023, 10:26 PM IST

माहिती देताना जितेंद्र आव्हाड

ठाणे : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुंब्रा येथे सुमारे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले होते. कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने भाष्य केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सध्या दंगली होत आहेत. काल गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले आहे. हा तर मुंब्रा आणि परिसराला बदनाम करण्याचा विषय तर आहेच शिवाय, हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचा डाव आहे.

शहराला बदनाम करण्याचे काम : हिंदू धर्मातील मुले एवढी मुर्ख आहेत की, ती स्वत:चे धर्मांतर करुन घेतील? त्यांनी गाझीयाबादच्या त्या पोलीस अधिकाऱयाला जाहीर आव्हान केले की, त्यांनी पुढे येऊन धर्मांतर करणाऱया मुलांचे नाव-पत्ते जाहीर करावेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यांनी केवळ चारच नावे जाहीर करावे. जर, खरोखर धर्मांतर झाले असेल तर त्याची दखल पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी घ्यायला हवी होती. जर चारशे मुलांचे धर्मांतर केले जात असेल तर हे अधिकारी काय करत होते? हा प्रकार म्हणजे एका शहराला बदनाम करुन त्याची अर्थव्यवस्था धुळीस मिळविण्याचा प्रयत्न आहे. आज मुंब्रा, कौसा, शिळ या भागात 5 कोटी चौरस फुटांचे अधिकृत बांधकाम सुरु आहे. अशा खोट्या बातम्या पसरवून अर्थव्यवस्था उदध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले. लीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. आपण राजीनामा द्यायला तयार आहोत, तसेच धर्मांतर झाल्याचे सत्य बाहेर न आणल्यास, 1 जुलैला मुंब्रा बंद -जितेंद्र आव्हाड

संविधानाच्या आधारामुळे धर्मांतरे बंद : धर्मांतराची ही बातमी खोटी आहे पण, तपासानंतरही ती खोटी निघाली तर काय करायचे. मुंब्य्राला हाताशी धरुन सबंध ठाण्याचे वातावरण खराब करायचे आहे. मग, जितेंद्र आव्हाड तिथे आहेत. मग, आपल्यावर तलवार चालवायची. माझ्या एकट्यासाठी काय काय करणार आहात? आता संविधानाच्या आधारामुळे धर्मांतरे बंद झाली आहेत. ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले होते; त्यांनी त्यावेळी धर्मांतरे केली होती. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आता तुम्ही या संविधानावरच तलवार चालवित आहात. हिंदू धर्माचा अपमान करणारे हे कोण आहेत? 400 मुलांनी धर्मांतर केल्याचा काय पुरावा आहे? ही चारशे मुले दाखवा, आपण राजीनामा द्यायला तयार आहोत. असे आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये दंगल घडविली जाणार : हे सर्व शिजवलेले नाट्य आहे. महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव समोर दिसत आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशातून असा फुसका बार सोडण्यात येत आहे. तसेच, कोणाकडून तरी दंगल घडवायची, असे प्रकार सुरु आहेत. आपण चार महिन्यांपूर्वीच सांगितले होते की, महाराष्ट्रामध्ये दंगल घडविली जाणार. त्याची पार्श्वभूमी ही राजकीय असेल. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, जो कोणी धर्मद्वेष पसरविणारे भाषण करेल, त्याच्या विरोधात तक्रार आली नाही तरी पोलिसांनी त्या भाषणावर त्वरीत गुन्हा दाखल करावा. ठाणे पोलिसांनी आजवर का गुन्हा दाखल केला नाही. हा गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांना निल़ंबित करणार का?

1 जुलैला मुंब्रा बंदचा दिली इशीरा : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी महाराष्ट्राला सांगावे की, गाझीयाबादमधून पोलीस अधिकाऱयाने जे सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे? अन्यथा, येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करुन हिंदू-मुस्लीम यांचा एकत्रित मोर्चा काढू. आमचे शहर असे बदनाम होऊ देणार नाही. या शहाराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून येथे सर्व धर्मिय लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशा शहराला बदनाम करणे योग्य नाही. आपण मुंब्रा शहराचे प्रतिनिधीत्व करीत असल्यानेच हा जाब विचारत आहे. अन् संविधानावर हात ठेवून धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे ज्या शहरात असे धर्मांतर घडलेच नाही. त्याची बदनामी करणाऱ्याला भरपाई करावीच लागेल. या प्रकरणात सरकारला उत्तर द्यावेच लागेल. ज्यापद्धतीने केरळ स्टोरीमध्ये 32 हजार मुलींची खोटी कथा सांगण्यात आली. तसाच हा प्रकार आहे, असेही आव्हाड म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न : भाजपच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याचा कट दिवा येथील भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना मारण्याचा कट रचला आला होता, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अमोल केंद्रे आणि रोहिदास पाटील यांना मारण्यासाठी कट रचण्यात आला होता. सुदैवाने ते त्यांच्या हाती लागले नाहीत म्हणून बचावले. भाजपच्याच कार्यकर्त्यांना मारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कट रचले जात असतील तर काय होणार या शहराचे? असा सवाल आव्हाड यांनी केला.

हेही वाचा -

  1. Nashik Crime 59 मुलांचे तस्करी प्रकरण बांग्लादेश कनेक्शनचा संशय 5 मौलवींना 12 दिवस पोलीस कोठडी
  2. charge sheet against Awhad डॉ जितेंद्र आव्हाडाच्या अडचणीत वाढ ठाणे पोलिसांकडून 500 पानाची चार्जशीट दाखल
  3. Jitendra Awhad सद्गुरूंनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Last Updated : Jun 8, 2023, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.