ETV Bharat / state

Eknath Khadse On Love Jihad : लव जिहाद, हिंदुत्ववादाच्या माध्यमातून मतदान होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षाचे प्रयत्न - एकनाथ खडसे - Eknath Khadse criticizes BJP

लव जिहादबद्दल राज्यात किंवा देशात जनाक्रोश मोर्चा काढला जात आहे. लव्ह जिहादला विरोध हा समाजात असला पाहिजे. परंतु, काही विशिष्ट पक्ष किंवा गट निवडणूक जवळ आल्या की, असे काहीतरी करतात, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप शिंदे गटाला लगावला आहे. ते कल्याण शहरात एका सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमाला आज (रविवारी) आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना खडसे यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली.

Eknath Shinde On Love Jihad
एकनाथ खडसे
author img

By

Published : Jan 29, 2023, 3:56 PM IST

एकनाथ खडसे

ठाणे : सी सर्व्हेच्या अहवालावर खडसे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगतले की, महाविकास आघाडीला लोकसभेत चांगल्या जागा म्हणजे चाळीत ते चौवेचाळीस जागा मिळतील अस समोर आले आहे. राज्यात ती सद्यपरिस्थिती आहे त्यावर आधारित असा हा सर्व्हे आहे. सध्याच राज्य सरकार अस्थिर असून सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो? त्यावर सरकार अवलंबून आहे. हे सरकार केवळ नाममात्र असून त्यांच्यात समन्वय नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना केवळ सत्तेच्या लालसेसाठी पक्ष फोडणे सर्वांना एकत्र करणे हा खटाटोप करण्यात आला.

राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचे कर्ज : खडसे पुढे म्हणाले कि, राज्यात सध्या बेरोजगारी महागाई असून उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. सामान्य माणसाला याचा काही लाभ होत नाही. म्हणून या सर्व्हेच्या माध्यमातून लोक या सरकारला मदत करणार नाही असेच दिसून येते. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीमध्ये सामील होणार की नाही? याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, या युतीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आला नाही किंवा तस बोलणेही झाले नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसा प्रस्ताव आला तर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील.

पेच असल्यामुळे विस्तार होत नाही : सरकार जेव्हा स्थापन झाल्यावर ७ महिन्यांचा कालावधी झाला. मात्र, अद्यापि मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. १८ मंत्री कारभार या राज्याचा पाहताहेत योग्य ते निर्णय होऊ शकत नाही. जनसंपर्क कमी पडत आहे. सर्व शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळात येण्यास इच्छुक आहेत. कोणाला घ्यावे हा पेच असल्यामुळे विस्तार होत नाही. एकदा विस्तार होऊ द्या, यातील असंतोष आपोआप उफाळून येईल, मला का डावलल या असंतोषाला तोंड देणे कठीण होईल. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

डॉक्युमेंट्रीमध्ये बाळासाहेबांचे नाव वापरू नये : माझ्या वडिलाचे नाव वापरू नका हे उद्धव ठाकरेचे स्वत:चे मत आहे. वस्तुस्थितीत ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. डॉक्युमेंट्रीमध्ये बालासाहेबाचे नाव वापरू नये हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या व्यक्तिगत मतावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले.

हेही वाचा : MP Supriya on Love Jihad : मला लव्ह आणि जिहादचा अर्थ कळतो, पण लव्ह जिहादचा अर्थ कळत नाही - सुप्रिया सुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.