ठाणे - ठाणे नौपाडा शहराची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावदेवी मंदिराला यंदा १०६ वर्षे पूर्ण होत असून देवीच्या चांदीच्या मुखवटाला देखील १०६ वर्षे झाली ( Naupada Gavdevi Temple completes 106 years ) आहेत. कोरानाच्या दोन अडीच वर्षांच्या महामारीनंतर भक्तांच्या अमाप उत्साहात नवरात्रोत्सवात ( Navratri 2022 ) साजरा होत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून महिलांनी देवीची ओटी भरण्यासाठी रांगा लावून मंडळाचे अध्यक्ष अशोक भट्टे यांनी सांगितले. गावदेवी देवीचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना येथे स्वतः ओटी भरता येत असल्यामुळे महिला भक्त गण मोठ्या प्रमाणावर दिसून ( Women crowd in Naupada Gawdevi Devi Temple ) येतात.
गावदेवीची स्थापना - भंडारी, सोमवंशी पाठारे समाजाची या गावदेवीची स्थापना भंडारी समाजाचे नारायण हिराजी वारे यांनी केली. आपल्या गावाचे आणि शहराचे रक्षण संकटापासून व्हावे यासाठी कोपरी पूर्व येथे देवीची स्थापना करण्यात आली होती. तर सध्या असलेले गावदेवी मंदिर ठाणे पश्चिमेला रेल्वेच्या फलाट क्रमांक सहा येथे होते. परंतू कालांतराने रेल्वेच्या विस्तारासाठी या मंदिराचे स्थलांतर नौपाड्यात गोखले रोड गावदेवी येथे करण्यात आले. देवीची मूळ मूर्ती दोन ते अडीच फूटाची दगडात कोरलेली असून देवीच्या डाव्या बाजूला दोन रक्षक तर उजव्या बाजूला एक रक्षक आणि एक पीठ आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात अष्टमीला होम हवन आणि भंडारा असतो. तर अश्विन नवरात्र उत्सव व्यतिरिक्त माघ महिन्यात चार दिवसीय शाखांभरी नवरात्र आणि चैत्र नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा होत असल्याचे अशोक भट्टे म्हणाले.
अशी झाली स्थापना - भंडारी समाजाकडून देवीची स्थापना. सध्या नौपाडा भागात असणारे देवीचे मंदिर काही वर्षांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ येथे होते. कालांतराने ठाणे शहराचा विस्तार झाल्याने रेल्वे स्थानकाची जागा अपुरी पडू लागली. तेव्हा रेल्वे स्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गोखले रोड नौपाडा येथे गावदेवी मंदिराची उभारणी करून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.