ठाणे : सर्वच ठिकाणी नवरात्र उत्सव ( Navratri 2022 ) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, प्रत्येक भाविक नवरात्रीत देवीची मनोभावे पूजा करतात. मात्र समाजात वावरत आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असताना सामाजिक भान राखून समाजाचे देणे लागत असल्याची भावना ठेवत समाजासाठी समाजातील अनेक नवदुर्गा करत ( Navratri festival 2022 ) असतात. अश्याच प्रकारे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गा आहेत. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक ( Navdurga Doctor Suchitra Naik ) .
सामाजिक ऐक्य जपण्याचा प्रयत्न : ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाचे पालकत्व प्राचार्य रूपाने पार पाडत असताना समाजातील आदिवासी भटक्या विमुक्त महिला आणि मुलींसाठी अनेक आदिवासी पाड्यात जाऊन आरोग्य शिबीर ( Navdurga Work for tribal girls health ) राबवत. त्या महिलांना आरोग्यविषयक माहिती देण्याचे काम नाईक यांनी केले. इतक्यावर न थांबता याच मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची तरतूद उपलब्ध करून त्यांना जगण्याचा वेगळा मार्ग उपलब्ध करून दिला. यातूनच अनेक आदिवासी भटक्या विमुक्त मुली शिक्षणासोबत जोडल्या गेल्या. त्यांचे आरोग्य सुधारून शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम तर डॉ. नाईक यांनी केलेच मात्र शिक्षणासारखे अमूल्य ज्ञान देऊन मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम या नवदुर्गेने केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या असल्याने मुलांबाबत विशेष संवेदनशीलता बाळगत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यांच्या जडणघडणीत मदत देखील केली. फक्त समुपदेशन न करता या विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण देऊन समाजातील उच्च स्तरावर नेऊन ठेवले. कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचे छत्रहरपले अश्या विद्यार्थ्यांना आर्थिकच नाही तर मानसिक मदत देऊ करून त्यांचा पालकत्वाचा भर देखील याच नवदुर्गेने उचलला. महाविद्यालयातील अंध अतुल्य दिव्यांग सेल च्या माध्यमातून मदतीची कार्य असो किंवा या विशेष मुलांना समाजात वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देखील दिले.
एका मुलाला घेतले दत्तक : या अनाथ मुलाला दत्तक घेत त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा गरजा भागवत शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम डॉ नाईक यांनी केले. आज तोच मुलगा केंद्र सरकारमध्ये प्रतिष्ठित नोकरी करतो. पेशाने प्राध्यापिका, समुपदेशक प्राचार्या असताना देखील आपल्यातील नवदुर्गेचे रूप समाजात सामाजिक कार्यातून प्रकट करणाऱ्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांना मानाचा मुजरा.