ETV Bharat / state

युतीच्या वाटाघाटीत भाजपचा घाटा झाल्याने माझी बंडखोरी - नरेंद्र पवार - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

कल्याणच्या शिवाजी चौकात नरेंद्र पवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन हुतात्मा भगतसिंग यांचे पणतू विक्रम सिंग संधू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरेंद्र पवार यांनी बंडखोरीचे कारण स्पष्ट केले.

नरेंद्र पवार
author img

By

Published : Oct 9, 2019, 7:31 PM IST

ठाणे - कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचा घाटा झाला. त्यामुळे मी तातडीने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यानंतरच बंडाळी केल्याचे विधान भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार यांनी केले.

युतीच्या वाटाघाटीत भाजपचा घाटा झाल्याने माझी बंडखोरी - नरेंद्र पवार

कल्याणच्या शिवाजी चौकात नरेंद्र पवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन हुतात्मा भगतसिंग यांचे पणतू विक्रम सिंग संधू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरेंद्र पवार यांनी बंडखोरीचे कारण स्पष्ट केले.
नरेंद्र पवार पुढे म्हणाले, की कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे कल्याण पश्चिम व पूर्व मतदार संघातील बंडखोरी रोखण्यासाठी युतीतील वरिष्ठ नेत्यांनी ठरल्याप्रमाणे उमेदवारी मागे घेण्यास समजूतदारपणा दाखवला नाही. मात्र, शिवसेनेचे धनंजय बोडारे यांनीच भाजप विरोधात बंडखोरी कायम ठेवल्याने मीही उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला गेल्या विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप आमदार पवारांचा पत्ता कट केला, तर कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेची बंडखोरी कायम ठेवल्याच्या खेळीने भाजप आमदार व कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरी भाजप आमदार नरेंद्र पवार यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे कल्याण पूर्व भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनीही शिवसेनेच्या खेळीचा निषेध व्यक्त करीत नरेंद्र पवार यांच्या बंडखोरीचे समर्थन केले.

Intro:किट 319

Body:युतीच्या वाटाघाटीत भाजपला घाटा झाल्याने माझी बंडाळी ,,, नरेंद्र पवार

ठाणे : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचा घाटा झाला. त्यामुळे मी तातडीने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यानंतरच बंडाळी केल्याचे विधान भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार यांनी केले.
कल्याणच्या शिवाजी चौकात नरेंद्र पवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शहीद भगतसिंग यांचे पणतू विक्रम सिंग संधू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नरेंद्र पवार यांनी भंडारी चे कारण स्पष्ट केले.
नरेंद्र पवार पुढे म्हणाले की कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे कल्याण पश्चिम व पूर्व मतदार संघातील बंडखोरी रोखण्यासाठी युतीतील वरिष्ठ नेत्यांनी ठरल्याप्रमाणे उमेदवारी मागे घेण्यास समजत नाही केला मात्र शिवसेनेचे धनंजय बोडारे यांनीच भाजप विरोधात बंडखोरी कायम ठेवल्याने मीही उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला गेल्या विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप आमदार पवारांचा पत्ता कट केला, तर कल्याण पूर्वत शिवसेनेची बंडखोरी कायम ठेवल्याच्या खेळीने भाजप आमदार व कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे कल्याण पूर्व भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनीही शिवसेनेच्या खेळीचा निषेध व्यक्त करीत नरेंद्र पवार यांच्या बंडखोरीचे समर्थन केले.

Conclusion:कल्याण विधानसभा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.