ETV Bharat / state

सरकार पाडण्याची मर्यादा मी ११ दिवसांनी वाढवली, नारायण राणेंचे भाकीत - महाविकास आघाडीचे सरकार पडणार

महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी एक भाकीत केले आहे. हे सरकार पाडण्याचा कालावधी मी ११ दिवसांनी वाढवला असल्याचा गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.

Narayan rane comment on Mahavikas Aaghadi
नारायण राणेंचे भाकित
author img

By

Published : Feb 23, 2020, 9:45 PM IST

Updated : Feb 23, 2020, 10:10 PM IST

ठाणे - माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या सरकारबाबत एक भाकीत केले आहे. महाविकास आघाडी सरकार आज की उद्या पडेल, अशी परिस्थिती असताना हे सरकार पडण्याची मर्यादा मी ११ दिवसांनी वाढवली असल्याचा गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.

ठाण्यातील भिवंडीमध्ये राणे एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या आपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. तसेच विकास कामांच्या पूर्तता करण्याची या मुख्यमंत्र्यांमध्ये क्षमता नसल्याचे ते म्हणाले. केवळ पदांसाठी सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्यासाठीच हे ३ पक्ष एकत्र आले असल्याचा आरोप राणेंनी केला. त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते असे मी भाकीत केल्याचे राणेंनी सांगितले.

नारायण राणेंचे भाकीत

Last Updated : Feb 23, 2020, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.