ETV Bharat / state

Nanavare Couple Suicide Case: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आरोपीला पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी - वकील ज्ञानेश्वर देशमुख

ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी (Nanavare Couple Suicide Case) पोलीस तपासात प्रगती होत नसल्याने, धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. याप्रकरणातील अटक आरोपींची आज कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता, २८ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nanavare Couple Suicide Case
ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 10:48 PM IST

Updated : Aug 25, 2023, 10:49 AM IST

माहिती देताना वकील

ठाणे : गृहमंत्री फडणवीस यांचे व पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन मृतक भावाला न्याय देण्यासाठी बोट छाटून घेतल्याने हे प्रकरण देशभर गाजत आहे. याप्रकरणातील अटक आरोपींची आज कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता, २८ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपी यापूर्वी पाच दिवस पोलीस कोठडीत असताना पोलिसांच्या तपासात सहकार्य करत नसल्याने, शिवाय अटक आरोपीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. तर मोबाईल सायबर आणि फॉरेन्सी लॉबकडे तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल अजुनपर्यत आला नसल्याचा युक्तिवाद फिर्यादीचे वकील वसीम शेख यांनी न्यायालयात केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करत चारही आरोपीना पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती, फिर्यादी धनंजय ननावरे यांचे वकील वशीम शेख यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आज स्वतः फिर्यादी धनंजय ननावरे हेही उल्हासनगर न्यायालयात हजर होते.

आरोपींची नावे : कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे असे पुन्हा पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या घटनेतील मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख, वकील नितीन देशमुख यांना या आदीच अटक पूर्व जामीन २८ ऑगस्टपर्यत असल्याने तूर्तास त्यांना अटक केली नसल्याची माहिती, खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास बोडके यांनी दिली आहे.

पाच दिवसाची पोलीस कोठडी : ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येला अठरा दिवस झाल्यानंतर ही पोलीस तपासाला वेग देत नाही. उलट तपास गुंडाळण्याचा मागे लागल असल्याचा आरोप करत मृतकचे भाऊ धनंजय ननावरे यांनी केला. त्यांनी त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट छाटून ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले. तसेच प्रत्येक आठवड्याला शरीराच्या एक एक अवयव छाटून पाठवणार असल्याचा इशारा धनंजय यांनी व्हायरल व्हिडिओ करून दिला होता. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत आठ आरोपी पैकी चार आरोपींना १८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी केला व्हिडीओ रेकॉर्ड : नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्टला पत्नी उज्वलासह उल्हासनगर ४ नंबर परिसरात आत्महत्या केली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत सुरूवातीला मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केले. मात्र त्यानंतर आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.

मृतदेहाच्या खिश्यात मिळाली चिट्ठी : पोलिसांनी घटनेच्या दिवशी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या खिश्यात एक चिट्ठीही मिळाली होती. या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा ओमी टीम कलानीचा खासम खास कमलेश निकम, शिंदे गटाचे आमदार किणीकर यांचा स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचा नेते नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची ही नावे आढळून आली होती. त्यानंतर व्हिडिओ आणि चिठ्ठीच्या आधारे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

उजव्या हातचे एक बोट छाटूले : सातारा जिल्हा भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख, कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची थेट आरोपी म्हणून नावे न टाकता त्यांना सरंक्षण दिले असल्याची खंत, धनंजय ननावरे यांनी व्यक्त केली. तर त्यांनी फलटण येथील राहत्या घरा समोर उजव्या हातचे एक बोट छाटून घेतले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : दरम्यानच्या काळात गुन्ह्याचा तपास हा विठ्ठलवाडी पोलिसांकडून काढून घेत ठाणे खंडणी शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र मृतकचे भाऊ धनंजय ननावरे हे आठवड्याभरापासून खंडणी विभागातील तपास अधिकाऱ्यांची भेट घेत फॉलअप घेत होते. मात्र त्यांना पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्य ते उत्तर मिळत नसल्याने, अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोदी सरकारला ह्याच बोटाने मतदान केल्याचे प्रायश्चित म्हणून पहिला अवयव बोट म्हणून पाठवत असल्याचे, धनंजय ननावरे यांनी व्हिडिओ मध्ये म्हटले आहे.

पुन्हा न्यायालयात हजर : ठाणे खंडणी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी यापूर्वीच सांगितले की, प्राथमिक तपास आणि धनंजयसह ननावरे कुटुंबीयांच्या जबाबानुसार, ननावरे कुटुंबीयांनी फलटण येथे शेजाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले होते. आरोपी, दोन्ही देशमुख वकील दुसऱ्या बाजूचे प्रतिनिधित्व करत होते. खंडणी विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक होती. आता मात्र या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडून युनिट पाच मधील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास बोडके यांच्याकडे वर्ग करण्यात आला. आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांचा न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पैशासाठी छळ : भावाला न्याय देण्यासाठी बोट छाटून घेतलेले धनंजय यांच्याशी संपर्क साधला असता “माझ्या भावाने आत्महत्येच्या एक दिवस आधी एका व्यक्तीला १० लाख रुपये दिले होते. त्याच्या बँक खात्याचे तपशील स्कॅन करताना मला याची माहिती मिळाली. पोलिसांनी याचा तपास करावा, कारण आरोपी पैशासाठीही त्याचा छळ करत होते. पलटण मधील आरोपी संग्राम निकाळजे आणि रणजीतसिंह निंबाळकर माझ्या भावाला मानसिक त्रास देत होते. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Nanavare Couple Suicide Case : ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; भावाने 'बोट' छाटून गृहमंत्र्यांना इशारा देताच चार आरोपींना अटक
  2. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; एडेलवाईजच्या व्यवस्थापकीय संचालकाची आठ तास चौकशी
  3. MLA Mushrif Met Shinde Family: उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: शिंदे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून मुश्रीफांच्या डोळ्यातही पाणी

Last Updated : Aug 25, 2023, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.