ETV Bharat / state

मोहर्रम सणानिमित्त भिवंडीत मुस्लिम बांधवांची भव्य मिरवणूक - भोईवाडा परीसर

मोहरम सणानिमित्त मुस्लीम बांधवांनी भिवंडीत भव्य मिरवणूक काढली. मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती.

मोहर्रमनिमित्त भिवंडीत मुस्लिम बांधवांची भव्य मिरवणूक
author img

By

Published : Sep 11, 2019, 11:50 AM IST

ठाणे - मोहरम सणानिमित्त मुस्लीम बांधवांनी भिवंडीत भव्य मिरवणूक काढली. मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांची मंगळवारी मिरवणूक काढून त्यांना ठंडे ( विसर्जीत )करण्यात आले.

शहरातील भोईवाडा परीसरातील शिया पंथीयांनी हैदर मशीदमध्ये सकाळपासून धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो शिया मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. दुपारी हैदर मशीद ते दर्गारोडवरील कोतवाल शहा दर्गापर्यंत मिरवणूक काढून विसर्जीत करण्यात आली. कामगार कुटुंबांनी आजचा दिवस आपल्या कुटुंबासह येथे आनंदात घालवला.

मोहर्रम सणानिमित्त भिवंडीत मुस्लिम बांधवांची भव्य मिरवणूक

शांतीनगर भागातील पिराणीपाडा येथील इराणी बांधवांनी मिरवणूक काढून आपल्या अंगावर मारून व जखमा करून दु:ख व्यक्त केले. तर गैबीनगर येथून सायंकाळी निघालेल्या मोठा ताजीयाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ही ताजीयाची मिरवणूक व इराणी बांधवांची मिरवणूक एस.टी.स्थानकासमोरील चव्हाण कॉलनीत समाप्त होऊन तेथे पंजा व ताजीया थंड करण्यात आले. शहरात मोहर्रम निमीत्ताने विविध ठिकाणी ताजीयाच्या मिरवणूका काढण्यात आाल्या होत्या. सर्व मिरवणुका शांततापुर्ण वातावरणात पार पडल्या. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला होता.

Intro:kit 319 Body:भिवंडीत मुस्लिम बांधवांची मोहर्रम सणानिमित्त भव्य मिरवणूक

ठाणे : मुस्लिम बांधवांच्या मोहर्रम सणानिमीत्ताने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांचे मंगळवारी मिरवणूक काढून त्यांना ठंडे ( विसर्जीत )करण्यात आले.
शहरातील भोईवाडा परीसरातील शिया पंथीयांनी हैदर मशीदमध्ये सकाळपासून धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो शिया मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती . दुपारी हैदर मशीद ते दर्गारोडवरील कोतवाल शहा दर्गापर्यंत मिरवणूक काढून ही मिरवणूक विसर्जीत करण्यात आली. मुस्लिम बांधवांचा आज मोहरम सण असल्याने शहरातील पॉवरलूम उद्योग बंद होते. त्यामुळे कामगार कुटूंबांनी आजचा दिवस आपल्या कुटूंबासह येथे आनंदात घालविला.
दुपारनंतर शांतीनगर भागातील पिराणीपाडा येथील इराणी बांधवांनी मोहर्रम निमीत्ताने मिरवणूक काढून आपल्या अंगावर मारून व जखमा करून दु:ख व्यक्त केले. तर गैबीनगर येथून सायंकाळी निघालेला मोठा ताजीयाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. हि ताजीयाची मिरवणूक व इराणी बांधवांची मिरवणूक एस.टी.स्थानकासमोरील चव्हाण कॉलनीत समाप्त होऊन तेथे पंजा व ताजीया थंड करण्यात आले.शहरात मोहर्रम निमीत्ताने विविध ठिकाणी ताजीयाच्या मिरवणूका काढण्यात आाल्या होत्या. शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात गणेशोत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूने मोहर्रम निमीत्ताने निघालेल्या मिरवणूका शांततापुर्ण वातावरणात संपन्न पार पडल्या. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला होता.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.