ठाणे: शनिवारी नया नगर परिसरात राहणारे अफसर खत्री आणि समीर रूपाणी यांच्या दारात चप्पल ठेवल्यावरून वाद झाला. या किरकोळ कारणामुळे भांडण इतके विकोपाला गेला की, समीर आणि त्याच्या पत्नीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये अफसर खत्री (वय 54 वर्षे) यांचा यामध्ये मृत्यू झाला. नया नगर पोलिसांना माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी सह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
मुख्य आरोपी फरार; पत्नीला अटक: मात्र मारहाण करणारा समीर रूपानी फरार झाला. घटनास्थळावरून आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. प्रकरणाची चौकशी केली असता समीर यांची पत्नी देखील आरोपी असल्याने पोलिसांनी जेनब रूपाणी हिला अटक केली. आरोपी जेनब रूपानीला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ८ मार्चपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून एका आरोपीला अटक करण्यात आली. एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली. यामध्ये फरार असलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी सय्यद जिलानी यांनी दिली.
शिवीगाळ करण्याच्या वादातून खून: शिवीगाळ करणाऱ्या अशोक शामराव वाघमारे (वय ३५) तरुणाचा दोन मित्रांनी महाशिवरात्रीला धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना ठाणे जिल्ह्यात 21 फेब्रुवारी, 2023 रोजी घडली होती. उल्हासनगर शहरातील बलकनजी बारी शाळेजवळ ही घटना घडली. पप्पू उर्फ पपडया जालीदंर जाधव ( वय ३६ रा. बालकंची बारी, खेमानीरोड, उल्हासनगर ), अमित रमेश पांडे ( वय ३० रा. महालक्ष्मी प्लॉस्टजेट कंपनी, अंबरनाथ ) असे अटक केलेल्या आरोपीची नावे होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास करून दोन्ही आरोपीना १२ तासातच बेड्या ठोकल्या होत्या. अशोक शामराव वाघमारे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धारधार शस्त्राने हल्ला: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मृतकमध्ये दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून शिवीगाळ झाली होती. याचा राग मनात धरून आरोपीने अशोकला मारण्याचा कट रचला होता. त्यातच महाशिवरात्रीला रात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागातील बालकंजी बारी शाळेजवळ ही घटना घडली. तीथे अशोक वाघमारे हा उभा असतानाच दोघा आरोपींनी अचानक येऊन त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यातच अशोक वाघमारे यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते.