नवी मुंबई : आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा (immoral relationship with mother in law) राग मनात धरून जावयाने मित्रांच्या मदतीने एकाचा निर्घुण खून (murder with help of friend) केल्याची धक्कादायक घटना तुर्भे येथे घडली (person having immoral relationship) आहे. मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास एपीएमसी मार्केटकडून तुर्भे नाका दिशेकडे उतरणाऱ्या ब्रीज खाली एका 40 ते 45 वर्षीय बंगाली व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.
गुन्हा दाखल : मृत व्यक्ती बंगाली बाबा म्हणून प्रचलीत होता. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मोनू राजकुमार दिक्षित (वय वर्ष 33) आणि हेमेंद्र फेकू गुप्ता (वय वर्ष 38) अशी या आरोपींची नावे असून त्यांना अनुक्रमे तुर्भे नाका आणि इंदिरानगर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली असून सदर आरोपींविरोधात भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली (Murder of person) आहे.
आरोपींना अटक : मयत व्यक्ती बंगाली बाबाचे आरोपी मोनू दिक्षितच्या सासूशी अनैतिक संबंध (Murder in immoral relationship) होते. हाच राग मनात धरून मोनूने आपला मित्र हेमेंद्र गुप्ताच्या मदतीने बंगाली बाबाला तुर्भे येथील एका ब्रीजखाली, सुरुवातीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राग अनावर झाल्याने फरशी आणि विटांनी डोके ठेचून ठार केले. सदर गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 चे विवेक पानसरे, सहा पोलीस आयुक्त तुर्भे विभागाचे गजानन राठोड, यांच्या मार्गदर्शना खाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुनिल कदम यांनी सुरु केला आणि अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना अटक (Murder In Navi Mumbai) केली.