ETV Bharat / state

कल्याणमध्ये गुन्हेगारी वर्चस्व-आर्थिक वादातून कुख्यात गुंडाची हत्या; आरोपीच्या शोधासाठी पाच पथके रवाना - thane gangster murder

अधुशहमा शब्बीर अन्सारी हा 2011 पासून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. तर जिग्नेश याचे कल्याण येथे किड्स वर्ल्ड नावाचे कपड्याचे दुकान, भिवंडी येथे मेडिकल स्टोअर्स, तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा येथे स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. तर धर्मेश उर्फ नन्नू शहा आणि जिग्नेश ठक्कर हे बालपणीचे मित्र आहेत. या दोघांमध्ये सध्या आर्थिक व्यवहार तसेच गुन्हेगारी वर्चस्वावरून वाद सुरू झाले.

jignesh thakkar
जिग्नेश ठक्कर
author img

By

Published : Aug 2, 2020, 10:47 AM IST

Updated : Aug 2, 2020, 2:31 PM IST

ठाणे - गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व तसेच आर्थिक वादातून कुख्यात गुंड मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याची दोन शुटर्सनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या नीलम गेस्ट हाऊसच्या गल्लीत शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा, त्याचा ड्रायव्हर जयपाल उर्फ जापान आणि दोन अनोळखी साथीदार, अशी हल्लेखोरांची नावे आहेत. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी अधुशहमा शब्बीर अन्सारी (वय - 37, रा. मदारछल्ला, अन्सारी चौक, कल्याण) याच्या जबाबानुसार फरार चौघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी पाच पोलीस पथके रवाना झाली आहेत.

अधुशहमा शब्बीर अन्सारी हा 2011 पासून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. तर जिग्नेश याचे कल्याण येथे किड्स वर्ल्ड नावाचे कपड्याचे दुकान, भिवंडी येथे मेडिकल स्टोअर्स, तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा येथे स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. तर धर्मेश उर्फ नन्नू शहा आणि जिग्नेश ठक्कर हे बालपणीचे मित्र आहेत. या दोघांमध्ये सध्या आर्थिक व्यवहार तसेच गुन्हेगारी वर्चस्वावरून वाद सुरू झाले. तीनच दिवसांपूर्वी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शंकरराव चौकात गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शहाचा साथीदार चेतन पटेल आणि जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया यांच्यात हाणामारी झाली होती. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास जिग्नेश ठक्कर हा त्याच्या कार्यालयातून बाहेर पडला. या कार्यालयासमोरील सुयश प्लाझा बिल्डींगच्या कोपऱ्यावर असलेल्या जनरेटरसमोर फोनवर बोलत उभा असतानाच धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा आणि त्याचा ड्रायव्हर जयपाल उर्फ जापान असे दोघे जिग्नेश ठक्कर याच्याजवळ आले. ते आपापसांत काहीतरी बोलू लागले. इतक्यात धर्मेश शहा आणि त्याचा ड्रायव्हर जयपाल यांनी पिस्तुलमधून जिग्नेशवर चार ते पाच गोळ्या झाडल्या.

हे पाहून अधुशहमा अन्सारी आणि अन्य काहीजण जिग्नेशच्या दिशेने धावले असता हल्लेखोर धर्मेश शहा आणि जापान या दोघांनी पिस्तुल रोखून 'कोई बीच मे आया तो ठोक देंगे', असे धमकावले. त्यानंतर धर्मेश शहा आणि जयपाल यांनी त्यांच्यासोबत आलेल्या आणखी दोन जणांसह कारमधून तेथून पलायन केले. तर छाती आणि पोटात गोळी लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या जिग्नेशला कालीदास चव्हाण याच्या स्कुटरवरून फोर्टीस हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विवेक पानसरे (पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडळ)

विशेष म्हणजे गेल्या 15 ते 18 वर्षांपूर्वी मृत मुनिया हा मुख्य आरोपी धर्मेश उर्फ नन्नू याच्या छत्रछत्रेत राहून गुन्हेगारी जगतात उदयास आला. मात्र, अलीकडच्या काळात मुख्य आरोपी धर्मेश उर्फ नन्नू याच्याशी वेगळे होऊन त्याने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बस्थान बसवले. यानंतर तो स्वतःच गुन्हेगारी क्षेत्रात हातपाय पसरायला लागला होता. त्याची मटका किंग मुनीया या नावाने गुन्हेगारी क्षेत्रात ओळखही व्हायला लागली होती. त्यामुळे मुख्य आरोपी धर्मेशने त्याचे गुन्हेगारी क्षेत्रातील वर्चस्व व आर्थिक वादातून त्याची हत्या केली.

दरम्यान, फरार हल्लेखोर धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याच्याविरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. तो एकेकाळी छोटा राजन गँगचा टॉप शुटर होता. तर मृत जिग्नेश ठक्कर याच्याविरुध्द खंडणी, जबरी चोरी असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. धर्मेश शहा आणि जिग्नेश ठक्कर हे दोघेही खंडणीच्या एका गुन्ह्यात सहआरोपी आहेत. फरार हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांची 5 पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत.

Last Updated : Aug 2, 2020, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.