ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेची गळा आळवून हत्या; ११ महिन्यातील सहावी घटना

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील गायत्रीनगर परिसरातील एका चाळीत हा प्रकार घडला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. अहमद रजा शहा (वय, २०) असे अटकेत असलेल्या पतीचे नाव आहे.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Dec 8, 2020, 7:46 PM IST

ठाणे - १९ वर्षीय नवविवाहित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील गायत्रीनगर परिसरातील एका चाळीत हा प्रकार घडला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. अहमद रजा शहा (वय, २०) असे अटकेत असलेल्या पतीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे विविध कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची ११ महिन्यातील भिवंडीतील ही सहावी घटना आहे.

४ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह..

भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगरमध्ये एका चाळीत आरोपी अहमद हा १९ वर्षीय तरुण पत्नीसह राहत होता. आरोपी पती हा एका लूम कारखान्यात कामगार म्हणून काम करीत होता. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. मात्र, तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून या पती-पत्नीमध्ये रोज भांडण होत होते. रविवारी ६ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. त्यावेळी पत्नीच्या ओढणीच्या साहाय्याने त्याने तिची गळा आवळून हत्या केली. त्यांनतर घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून आरोपी पती अहमद रजा याला अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण कबाडी करीत आहेत.

भिवंडीत गेल्या ११ महिन्यात सहावी घटना

  1. भिवंडी शहरातील गायत्रीनगर येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीने डोक्यात लोखंडी अँगल मारून केली होती निर्घृण हत्या.
  2. भिवंडी तालुक्यातील पूर्णा या गावात क्षुल्लक वादातून पतीने लोखंडी पाईप डोक्यावर, तोंडावर, पायावर मारून पत्नीची केली होती निर्घृण हत्या.
  3. पूर्णा येथेच मुलीला पत्नी स्तनपान करत नसल्याच्या रागातून गुरुद्वारात पुजारी म्हणून काम करणाऱ्या पतीने डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून केली होती हत्या.
  4. भिवंडी शहरातील श्रीरंगनगर परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने रघ (ब्लॅंकेट) आवळून आणि तोंडावर उशी दाबून हत्या केल्याची घटना घडली होती.
  5. प्रियकरासोबत पत्नीची नग्न अवस्थेतील मोबाईल व्हिडिओ क्लिप पाहताच, पतीने तिचा चाकूने वार करून खून केला होता. ही घटना गेल्याच महिन्यात भिवंडीतील नागाव रस्त्यावरील एका चाळीत घडली होती. हत्या करून पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

दरम्यान, या सहाही घटना पाहता टाळेबंदी काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पती-पत्नीमधील रक्तरंजित हिंसाचार वाढल्याने भिवंडीत हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.