ETV Bharat / state

वाशी येथील महापालिका रुग्णालय लवकरच कोविडमुक्त होऊन इतर रुग्णांसाठी खुले होणार

author img

By

Published : Oct 5, 2020, 5:29 PM IST

वाशी येथील महानगरपालिका रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केल्यापासून सर्वसामान्य रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच खासगी रुग्णालयेही डॉक्टरांनी बंद केले होते. त्यामुळे वाशीमधील पालिका रुग्णालय कोविडमुक्त करावे, ही मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून गणेश नाईक करत होते.

Municipal Hospital
रुग्णालय

नवी मुंबई - नवी मुंबईत सर्व खासगी दवाखाने बंद आहेत. सद्यस्थितीत अनेक साथीच्या रोगांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार आहे. मात्र, वाशीमध्ये असणारे नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय हे गेल्या 6 महिन्यांपासून, कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे रुग्णालय कोविडमुक्त व्हावे म्हणून ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक हे मागणी करत होते. सद्यस्थितीत वाशी येथील कोविड रुग्णालय कोविडमुक्तीकडे वाटचाल करत असून, येत्या 5 ते 6 दिवसात सर्वसामान्य रुग्णांना हे रुग्णालय खुले होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. ते आज आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यासाठी नवी मुंबई पालिकेत गेले होते.

गणेश नाईक - आमदार

हेही वाचा - मुंबई : शिक्षण समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशींची निवड; भाजपची दोन मते फुटली

वाशी येथील महानगरपालिका रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केल्यापासून सर्वसामान्य रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच खासगी रुग्णालयेही डॉक्टरांनी बंद केले होते. त्यामुळे वाशीमधील पालिका रुग्णालय कोविडमुक्त करावे, ही मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून गणेश नाईक करत होते. सद्यस्थितीत वाशी रुग्णालयाची कोविडमुक्त रुग्णालयाकडे वाटचाल सुरू असून, सध्या एक ते दोन कोविड रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत, असे नाईक यांनी सांगितले. हे रुग्ण बरे होऊन निघून गेले की, कोविडचे रुग्ण घेणे बंद होईल व वाशी रुग्णालय कोविडमुक्त होईल, अशी चर्चा नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत झाली असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.

वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये 1100 बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले असून, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सोयही त्या ठिकाणी आहे. तसेच फॉर्टीज या खासगी रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेचा कोटा बंद झाला आहे. हा कोटा गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी वापरण्यात यावा अशी विनंती आयुक्त अभिजित बांगर यांना नाईक यांनी केली.

बारवी धरणाच्या माध्यमातून एमआयडीसीला पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने ते धरण बांधले होते. धरणाची उंची वाढवलेल्यानंतर ते पाणी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर नवी मुंबई या शहरांना दिले. नवी मुंबईचा 50 एमएलडी कोटा अबाधीत ठेवला जावा, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे. याप्रमाणे गणेश नाईक यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन शहरातील इतर प्रश्नांसंबंधी चर्चा केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.