ETV Bharat / state

मीरा भाईंदरमध्ये कोविड रुग्ण दाखवून लुबाडणाऱ्या रुग्णालयावर पालिकेची कारवाई

author img

By

Published : Jun 4, 2021, 7:37 PM IST

मीरा रोड येथील आर्किड रुग्णाल्यावर संशय अधिक वाढल्यामुळे ३१ मे रोजी पालिकेच्या आरोग्य पथकाद्वारे धाड टाकण्यात आली.

मनपा कारवाई
मनपा कारवाई

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा रोड येथील आर्किड रुग्णालयात बिगर कोविड रुग्णांचा कोरोना अहवाल सकारात्मक दाखवून पैसे लुबाडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णालयावर पालिका प्रशासनाने धाड टाकून रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द केली आहे.

कोविड रुग्ण दाखवून लुबाडणाऱ्या रुग्णालयावर पालिकेची कारवाई

अशी केली जात होती लूट

मीरा भाईंदर शहरातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पालिका प्रशासनाकडून अधिकाधिक कोरोना चाचणीवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरी देखील काही खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्येत घट होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास येत होती. त्यामुळे अशा रुग्णालयांवर व खासगी प्रयोग शाळेवर पालिकेकडून विशेष लक्ष देण्यात येत होते. त्यामध्ये मीरा रोड येथील आर्किड रुग्णाल्यावर संशय अधिक वाढल्यामुळे ३१ मे रोजी पालिकेच्या आरोग्य पथकाद्वारे धाड टाकण्यात आली. यात रुग्णालयात तब्बल ५हून अधिक रुग्ण हे कोरोनाबाधित नसताना देखील त्यांच्यावर कोविड उपचार करण्यात येत असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांच्या नावावर खोटे नमुने तयार करून ते अपूर्वा या प्रयोगशाळेच्या मदतीने सकारात्मक करून घेतले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आर्किड रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द करण्यात आली असून पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रिजेश पटेल यांच्या तक्रारीवरुन अर्चिड हॉस्पिटलचे डॉ. पिरजादा असिफ शफीउद्दीन, अपूर्वा लॅबचे डॉ. कांचन आर, स्वस्तिक लॅबचे डॉ.विठ्ठल रेड्डी यांच्यावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-अठरा वर्षांवरील सर्व लोकांना लस देणारे गोवा ठरणार देशातील पहिले राज्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.