ETV Bharat / state

मुंबईचे गोरखपूर होते आहे - जितेंद्र आव्हाड - Aarey Tree cutting Case

एखादी भीषण दंगल होऊन गेल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असतं, तसं वातावरण काल आरेच्या जंगलामध्ये होते.

जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Oct 6, 2019, 3:51 PM IST

ठाणे - एखादी भीषण दंगल होऊन गेल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण काल आरेच्या जंगलामध्ये होते. संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या जाणाऱ्याची ओळखपत्रासह तपासणी, प्रत्येकाची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात होती. कॉलेजमधून परत आलेल्या एका मुलीला, तिचे आदिवासी वडील आपल्या पाड्यातून तिचे आधार कार्ड घेऊन येईपर्यंत पोलिसांनी अडकवून ठेवले होते.

प्रतिक्रिया दताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड

फरक इतकाच की, तिथे दंगल/हत्याकांड सरकारच करत होते. झाडांची बेसुमार कत्तल चालली होती. ती थांबवण्यासाठी जे कोणी पुढे येतील त्यांना अडवण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त होता. सदासर्वकाळ पर्यावरणाचे गोडवे गाणारे सरकार स्वतः पर्यावरणाचा विध्वंस करत होते.

मी दुपारी तीनच्या सुमारास तिथे पोहोचलो तेव्हा काही केल्या पोलीस आपल्याला आरे जंगलात प्रवेश देणार नाहीत याची खात्री पटली. आमदारकीचा तोरा मिरवण्यात अर्थ नव्हता. पोलीस बिचारे "वरून" आलेल्या हुकुमाला बांधील होते. माझे नशीब चांगले की, त्याच वेळी जंगलातल्या आदिवासी पाड्यामध्ये राहणारी एक महिला आमच्या मदतीला धावली. जंगलातील चोरवाटांची तिला खडा न खडा माहिती होती. आपली झाडे का पडली जात आहेत हा यक्षप्रश्न तिलाही पडला होता.

पोलिसांची नजर चुकवून आडवळणाच्या वाटेने तिच्या मदतीने आम्ही जंगलात प्रवेश केला. काही अंतर मोटारसायकलने पार केले. जिथे झाडे कापली जात होती तिथपर्यंतचे साधारण ९ किलोमीटरचे अंतर आम्ही पायी गेलो. ही वृक्ष छाटणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा असा निर्धार केला होता. त्यामुळे एक प्रकारचा गनिमी कावा करत तिथे प्रवेश करण्याचा हा एक चित्तथरारक अनुभव होता.

तिथे पोहोचल्यानंतर मात्र जे दृश्य दिसले ते हृदयद्रावक होते. कंत्राटदारांचे शेकडो मजूर त्यांच्या यांत्रिक करवतींनी सपासप झाडे छाटत होते. साधारणपणे दोन मिनिटात ७०/८० वर्षाचे झाड भुईसपाट होत होती. त्यांच्या फांद्या छाटून ओंडके ट्रक मध्ये भरायचे काम झपाट्याने चालू होते. पर्यावरणाचा विध्वंस इतक्या वेगाने होऊ शकतो यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही जमतील तितके व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. एका झाडाच्या कलेवरापाशी उभा राहिलो, तेव्हा डोळ्यात पाणी आले. मुंबई ठाण्याला अथकपणे प्राणवायू देणारा तो जीव स्वतःच निष्प्राण होऊन पडला होता. अशा अनेक प्रेतांचा खच तिथे पडला होता. तेवढ्यात पोलिसांना सुगावा लागला. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना त्यांनी दंडाला धरून बाहेर काढले.

हेही वाचा- आरेमधील वृक्षतोडीचा निषेध; ठाण्यात युवकांचे आंदोलन

विकासाच्या नावाखाली हे काय चाललंय? "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" ही शिकवण देणाऱ्या तुकोबाच्या महाराष्ट्रात हा संहार चालू असताना शाकाहाराचे समर्थक तोंडात काय गोमूत्राची गुळणी घेऊन बसले आहेत काय? परवा रात्री या संहाराच्या विरोधात आंदोलन करणारे कुणी मोठे नेते नव्हते. त्यांची कुठल्या राजकीय पक्षाशी बांधिलकी नव्हती. ते सारे मध्यमवर्गीय, नोकऱ्या करणारे, कॉलेजात शिकणारे विद्यार्थी होते. आम्हाला पायवाटेने नेणारी आदिवासी भगिनी आणि या आंदोलकांमध्ये समान धागा होता तो एकच. ते सारे झाडांना सोयरे मानणारे होते.

हेही वाचा- मनसेकडून ३६ किलोमीटर पायी फिरून होणार प्रचार; अविनाश जाधवांच्या 'इंजिन'ची मुसंडी

त्या २९ जणांना अटक करून सरकारने काय भीष्मपराक्रम केला? कधी ना कधी या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागणार आहेत. नवरात्रात दांडिया खेळावा इतक्या सहजपणे सरकारने आरेतील झाडांवर करवती चालवल्या आहेत. ऑक्सिजनच्या अभावामुळे गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचा बळी गेला. अडीच हजार झाडांची कत्तल करून महाराष्ट्र सरकार आता मुंबईचे गोरखपूर करायच्या वाटेवर आहे.

Intro:मुंबईचं गोरखपूर होते आहे जितेंद्र आव्हाडBody:

एखादी भीषण दंगल होऊन गेल्यानंतर जसं तणावपूर्ण वातावरण असतं, तसं वातावरण काला आरे च्या जंगलामध्ये होतं. संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या जाणाऱ्याची ओळखपत्रासह तपासणी, प्रत्येकाची कसून चौकशी पोलीस करत होते. कॉलेजमधून परत आलेल्या एका मुलीला, तिचे आदिवासी वडील आपल्या पाडयातून तिचं आधार कार्ड घेऊन येईपर्यंत पोलिसांनी अडकवून ठेवलं होतं.

फरक इतकाच की, तिथे दंगल/ हत्याकांड सरकारच करत होतं. झाडांची बेसुमार कत्तल चालली होती आणि ती थांबवण्यासाठी जे कोणी पुढे येतील त्यांना अडवण्यासाठी हा पोलिस बंदोबस्त होता. सदासर्वकाळ पर्यावरणाचे गोडवे गाणारं सरकार स्वतः पर्यावरणाचा विध्वंस करत होतं.

मी दुपारी तीनच्या सुमारास तिथे पोचलो तेव्हा काही केल्या पोलीस आपल्याला आरे जंगलात प्रवेश देणार नाहीत याची खात्री पटली. आमदारकीचा तोरा मिरवण्यात अर्थ नव्हता. पोलीस बिचारे "वरून" आलेल्या हुकुमाला बांधील होते. माझं नशीब चांगलं की त्याच वेळी जंगलातल्या आदिवासी पाड्यामध्ये राहणारी एक महिला आमच्या मदतीला धावली. जंगलातील चोरवाटांची तिला खडा न् खडा माहिती होती. आपली झाडं का पडली जात आहेत हा यक्षप्रश्न तिलाही पडला होता. पोलिसांची नजर चुकवून आडवळणाच्या वाटेने तिच्या मदतीने आम्ही जंगलात प्रवेश केला. काही अंतर मोटारसायकलने पार केलं. जिथे झाडं कापली जात होती तिथपर्यंतचं साधारण 9 किलोमीटरचं अंतर आम्ही पायी गेलो. ही वृक्ष छाटणी स्वतःच्या डोळ्यांनी पहायची असा निर्धार केला होता. त्यामुळे एक प्रकारचा गनिमी कावा करत तिथे प्रवेश करण्याचा हा एक चित्तथरारक अनुभव होता.

तिथे पोहोचल्यानंतर मात्र जे दृश्य दिसलं ते हृदयद्रावक होतं. कंत्राटदारांचे शेकडो मजूर त्यांच्या यांत्रिक करवतींनी सपासप झाडं छाटत होते. साधारणपणे दोन मिनिटात ७०/८० वर्षाचं झाड भुईसपाट होत होतं. त्यांच्या फांद्या छाटून ओंडके ट्रक मध्ये भरायचं काम झपाट्याने चालू होतं. पर्यावरणाचा विध्वंस इतक्या वेगाने होऊ शकतो यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही जमतील तितके व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. एका झाडाच्या कलेवरापाशी उभा राहिलो तेव्हा डोळ्यात पाणी आलं. मुंबई ठाण्याला अथकपणे प्राणवायू देणारा तो जीव स्वतःच निष्प्राण होऊन पडला होता. अशा अनेक प्रेतांचा खच तिथे पडला होता. तेवढ्यात पोलिसांना सुगावा लागला. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना त्यांनी दंडाला धरून बाहेर काढलं.

विकासाच्या नावाखाली हे काय चाललंय? "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" ही शिकवण देणाऱ्या तुकोबाच्या महाराष्ट्रात हा संहार चालू असताना शाकाहाराचे समर्थक तोंडात काय गोमूत्राची गुळणी घेऊन बसले आहेत काय? परवा रात्री या संहाराच्या विरोधात आंदोलन करणारे कुणी मोठे नेते नव्हते. त्यांची कुठल्या राजकीय पक्षाशी बांधिलकी नव्हती. ते सारे मध्यमवर्गीय, नोकऱ्या करणारे, कॉलेजात शिकणारे विद्यार्थी होते. आम्हाला पायवाटेने नेणारी आदिवासी भगिनी आणि या आंदोलकांमध्ये समान धागा होता तो एकच. ते सारे झाडांना सोयरे मानणारे होते. त्या २९ जणांना अटक करून सरकारने काय भीष्मपराक्रम केला? कधी ना कधी या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत. नवरात्रात दांडिया खेळावा इतक्या सहजपणे सरकारने आरेतील झाडांवर करवती चालवल्या आहेत. ऑक्सिजनच्या अभावामुळे गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचा बळी गेला. अडीच हजार झाडांची कत्तल करून महाराष्ट्र सरकार आता मुंबईचं गोरखपूर करायच्या वाटेवर आहे.

Byte डॉ. जितेंद्र आव्हाडConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.