ETV Bharat / state

Bullet Train Thane Station : ठाण्याला आहे बुलेट ट्रेनच्या स्टेशनची प्रतिक्षा; कामाचा अद्याप ठावठिकाणाही नाही

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा काम कुठपर्यंत आले याचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे. बीकेसीनंतर ठाणे हे दुसरे स्टेशन आहे. पण सध्या या स्टेशनचे कुठलेही काम जमिनीवर सुरू नसल्याचे दिसून आले आहे. सध्या जमीन हस्तांतरित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

bullet train
बुलेट ट्रेन
author img

By

Published : Jan 12, 2023, 4:45 PM IST

Updated : Jan 12, 2023, 10:27 PM IST

बुलेट ट्रेन कामाचा प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

ठाणे - राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर बुलेट ट्रेनचा प्रकल्प जलद गतीने व्हावा, यासाठी शिंदे फडणवीस सरकारने जोर लावलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहणाचं काम जवळजवळ थांबले होते. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने सर्वात आधी बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाऊल उचलायला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे ठाण्यात बुलेट ट्रेनच्या स्टेशनचे अद्याप कामच सुरू झाले नाही. स्पॉटला जाऊन 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता, तिथे अद्याप कामच सुरू झाले नसल्याचे दिसून आले आहे.

bullet train
ठळक मुद्दे

काय झाले काम? : जमीन अधिग्रहणाचे काम राज्य सरकारने पूर्ण केले असले तरी, ठाणे येथे होणाऱया बुलेट ट्रेनच्या स्टेशनचे काम अद्याप सुरूच झाले नाही, अशी परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या दिवा परिसरामधील बेतवडे, म्हातर्डे, आगासन या गावात बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार आहे. यासाठी स्थानिक शेतकऱ्यांशी जमीन देखील घेण्यात आली आहे. राज्य सरकारकडून स्टेशन परिसरात येणारी काही घरे देखील तोडण्यात आली आहेत. मात्र, अद्याप स्टेशनच्या कामाला सुरुवातच झालेली नाही. अद्याप एकही वीट स्टेशनसाठी रचण्यात आलेली नाही. बेतावडे, म्हातर्डे, आगासन गाव परिसरात हे स्टेशन होणार आहे.

स्टेशनबद्दल माहिती : बेतावडे, म्हातर्डे, आगासन गाव या गावाच्या जवळून सेंट्रल रेल्वे जाते. त्यामुळे ठाण्याचं बुलेट ट्रेन स्टेशन या भागामध्ये होऊन सेंट्रल रेल्वेशी ते जोडलं जाईल, आणि गुजरातहून ठाणे परिसरात येणाऱ्या व्यापारी किंवा इतर नागरिकांना ठाणे आणि इतर परिसरामध्ये जाण्यासाठी लोकल ट्रेन उपलब्ध होईल, अशी कनेक्टिव्हिटी या स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याबाबतचे आयोजन 'मुंबई अहमदाबाद हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्ट' च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम अत्यंत जलदगतीने होत असले, तरी राज्य सरकारमध्ये जमीन अधिग्रणाशिवाय सध्या इतर कामासाठी पुढाकार झालेला दिसत नाही.

जागा हस्तांतरित : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहणात खास लक्ष देऊन लवकरात लवकर जमीन अधिग्रहण होईल. यासाठी बैठकांचे सत्र सुरू केलं होतं. आता जमीन अधिग्रहणाचं काम मुंबई ठाणे आणि पालघर असं तिने जिल्ह्यामधून जवळपास 98 टक्के पूर्ण झाला आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात 288 हेक्टर तर, ठाणे जिल्ह्यामध्ये 138 हेक्टर जागा हस्तांतरित होणे आवश्यक होतं. त्यानुसार जमीन अधिग्रहण जवळजवळ पूर्ण झाल आहे.

bullet train
बुलेट ट्रेन माहिती

स्टेशनचे बदलले डिझाईन - ठाणे जिल्ह्यात अनेक खारफुटीची झाडे आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प ठाणे जिल्ह्यातून जात असल्यामुळे या झाडांची कत्तल करण्यात येत आहे. याआधी ठाण्यातील रुटचे डिजाईन तयार करण्यात आले होते. मात्र, त्यामुळे जवळपास 51 हजार झाडांची कत्तल करण्यात येणार होती. परंतु, पुन्हा या डिजाईनमध्ये बदल करण्या्त आला. या बदलामुळे जवळपास 21 हजार झाडांची कत्तल होणार नाही.

Last Updated : Jan 12, 2023, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.