ETV Bharat / state

कोट्यवधी रुपये पाण्यात..! नुतनीकरण केलेला मुंब्रा बायपास उखडल्याने प्रवाशांमध्ये रोष

करोडो रुपये खर्च करून दुरुस्त केलेला मुंब्रा बायपास रस्ता उखडला गेला आहे. यावेळी तर त्या रस्त्याच्या आतील लोखंडी सळया देखील दिसतायेत.

author img

By

Published : Jul 19, 2019, 9:12 AM IST

मुंब्रा बायपास उखडला

ठाणे- कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्त केलेला मुंब्रा बायपास रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे. यावेळी तर त्या रस्त्याच्या आतील लोखंडी सळया देखील उघड्या पडल्या आहेत. गेल्याच वर्षी तब्बल 4 महिने हा रस्ता बंद ठेऊन त्यावर दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र यावर्षी झालेल्या इतक्या कमी पावसात देखील हा रस्ता पुरता उखडला गेलाय. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च केलेले शेकडो कोटी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेले असेच म्हणावे लागेल.

मुंब्रा बायपास उखडला

नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईकरांसाठी तसेच भिवंडी, गुजरात, जेएनपीटी इथे होणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी मुंब्रा बायपास अतिशय महत्वाचा रस्ता आहे. तरी देखील या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा असा समजला जाणारा मुंब्रा बायपास हा जे एन पी टी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर, नवी मुंबई या ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या रस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. आतापर्यंत अपघातात शेकडो प्रवाशांचे जीव या रस्त्यावर गेले आहेत. वाहतूक पोलीस आणि मुंब्रा पोलीस यांचं नियोजन असलं तरी या ठिकाणची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात. त्याचा फटका वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना बसतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

Intro:करोडो रुपये खर्च करून दुरुस्त केलेला मुंब्रा बायपास उखडला प्रवाश्यांमध्ये रोषBody:मुंब्रा बायपास पुन्हा एकदा खड्डेमय झालाय. यावेळी तर त्या रस्त्याच्या आतील लोखंडी सळ्या देखील दिसतायेत. गेल्याच वर्षी तब्बल 4 महिने हा रस्ता बंद ठेऊन त्यावर दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र या वर्षी झालेल्या इतक्या कमी पावसात देखील हा रस्ता पुरता उखडला गेलाय. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती साठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च केलेले शेकडो कोटी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेले असेच म्हणावे लागेल. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईकरांसाठी तसेच भिवंडी, गुजरात, जेएनपीटी इथे होणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी मुंब्रा बायपास अतिशय महत्वाचा रस्ता आहे. तरी देखील या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा असा समजला जाणारा मुंब्रा बायपास हा जे एन पी टी कल्याण डोंबिवली वसई विरार पालघर नवी मुंबई या ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या रस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे आतापर्यंत शेकडो प्रवाशांचे जीव या रस्त्यावर झालेल्या अपघातात गेलेले आहेत वाहतूक पोलीस आणि मुंब्रा पोलीस यांचं नियोजन असलं तरी या ठिकाणची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात आणि त्याचा फटका वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना बसतो यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्रवासी करताहेत राज्य सरकारने या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून उपाययोजना करण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत.

Byte - 1 प्रवासी 2 प्रवासी 3 प्रवासी Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.