ETV Bharat / state

MP Dr Shrikant Shinde: मुख्यमंत्र्यांचा मुलगा खा. डॉ. श्रीकांत शिंदेंची 'वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन'च्या उपाध्यक्षपदी निवड

MP Dr Shrikant Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची 'वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन'च्या उपाध्यक्षपदी (MP Dr Srikant Shinde) निवड करण्यात आली आहे. (Western India Football Association) या संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत ही निवड पार पडली. स्वत: डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली. (Selection of Dr Srikant Shinde)

MP Dr Shrikant Shinde
खा. डॉ. श्रीकांत शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 10:50 PM IST

ठाणे MP Dr Shrikant Shinde: भारतातील फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकित 'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'शी संलग्न असलेल्या 'द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या' (WIFA) कार्यकारी समितीच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत ही निवड झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

MP Dr Shrikant Shinde
बैठकीला संबोधित करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

'हे' आहे संस्थेचे महत्त्व: 'द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन' ही संस्था भारतात फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकित 'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'शी संलग्न आहे. तर, महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमनही या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आणि देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळासाठी आवश्यक गोष्टींची उभारणी करण्यासाठी काम करणारी ही सर्वांत जुनी संस्था १९११ पासून कार्यरत आहे. देशातील सर्वांत जुनी दुसरी स्पर्धा असलेल्या 'रोव्हर्स कप'ची सुरुवात संस्थेच्या स्थापनेपूर्वीच झाली होती. राज्यातील फुटबॉल खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेमार्फत विविध ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे.

'याकरिता' संस्था करणार प्रयत्न: 'द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या'(WIFA) कार्यकारी समितीची शनिवारी मुंबई येथे बैठक पार पडली. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आणि देशात फुटबॉलसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा आणि पोषक वातावरण निर्माण करण्यात ही संस्था नक्कीच योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना फुटबॉलच्या मुख्य प्रवाहात आणण्याला प्राधान्य असल्याच्या भावना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. या बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजीराजे, सुनील धांडे, विश्वजीत कदम, हरेश वोरा, किरण चौगुले, ए. सलीम परकोटे, सहसचिव आणि कार्यकारी समितीतील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी...; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला 'प्लॅन बी'
  2. Cricket World Cup २०२३ : नेदरलँडविरुद्ध बांग्लादेशची फजिती, छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ गडी बाद; वाचा स्कोर
  3. Cricket World Cup २०२३ : पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होण्याच्या वाटेवर, रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेनं केला पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.