ETV Bharat / state

आईची एक महिन्यानंतर कोरोनावर मात; नवजात बाळाला सुपूर्द करताना आले भरुन - mother win battle against corona thane

ठाण्यातील एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला 14 जून रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. मात्र, यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या नवजात कन्येच्या वडिलांनाही क्वारंटाईन करण्यात आले.

mother cure from corona and receive her child after one month thane
आईची एक महिन्यानंतर कोरोनावर मात; नवजात बाळाला सुपूर्द करताना आले भरुन
author img

By

Published : Jul 13, 2020, 7:20 AM IST

Updated : Jul 13, 2020, 8:41 AM IST

ठाणे - कोरोनाच्या या महासंकटातही अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन होताना दिसत आहे. एका महिन्याआधी येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तिच्या नवजात बाळाच्या संगोपनाचा प्रश्न समोर आला होता. मात्र, समीक्षा मार्कंडे यांनी त्या नवजात बालकाचा आईप्रमाणे सांभाळ केला. एक महिन्यानंतर त्या बाधित महिलेने कोरोनावर मात केली. यानंतर त्या बाळाला परत न्यायला आले असता हे बाळ सोपवताना समीक्षा यांना शोक अनावर झाला.

येथील एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला 14 जून रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. मात्र, यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या नवजात कन्येच्या वडिलांनाही क्वारंटाईन करण्यात आले. यानंतर या नवजात कन्येच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीत मनसेने केलेल्या आवाहनानंतर महिला मनसेच्या उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांनी या कन्येच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आणि महिनाभर ही जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा - ऐश्वर्या बच्चन आणि आराध्यालाही कोरोनाची लागण

यानंतर बाधित महिलेने कोरोनावर मात केल्यावर या बाळाला तिच्याकडे सोडताना त्यांना भरुन आले होते. मागील महिन्यापासुन नवजात बाळ राजनंदिनीचे आणि या कुटुंबाचे घरचे नाते बनले होते. यावेळी तिच्या आईजवळ सोपवताना समीक्षा यांना भरुन आले होते.

आईची एक महिन्यानंतर कोरोनावर मात; नवजात बाळाला सुपूर्द करताना आले भरुन

या वेळी ठाणे-पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी या बाळाला झोपायचा पाळणा, खेळणी अशा भेटवस्तू देऊन आईवडिलांसोबत त्याची पाठवणी केली. तर या बाळाला आई वडिलांकडे सोपवून आमचे कर्तव्य संपले नाही. या बाळाची भावी आयुष्यातील सर्व जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेईल, अशी ग्वाही अविनाश जाधव यांनी दिली.

Last Updated : Jul 13, 2020, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.