ETV Bharat / state

नवी मुंबईत 120 नव्या रुग्णांची नोंद, 62 जणांची कोरोनावर मात - नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या

गेल्या 15 दिवसांपासून नवी मुंबईतील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे, प्रशासनाच्या चिंतेत भर होत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 972 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यातील 11 रुग्ण हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत शहरातील 17 हजार 289 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

corona cases in navi mumbai
नवी मुंबईत 120 नव्या रुग्णांची नोंद
author img

By

Published : Jun 22, 2020, 7:11 PM IST

नवी मुंबई - शहरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार हजार आठशे पार आहे. आजही शहरात 120 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 62 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 15 दिवसांपासून नवी मुंबईतील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे, प्रशासनाच्या चिंतेत भर होत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 972 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यातील 11 रुग्ण हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत शहरातील 17हजार 289 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 542 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 786 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबीत आहेत.

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4 हजार 961 इतकी आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 120 रुग्णांमध्ये तुर्भेमधील 9, बेलापूरमधील 10, कोपरखैरणेमधील 32, नेरुळमधील 26, वाशीतील 11, घणसोलीमधील 13, ऐरोलीमधील 14, तर दिघ्यातील 5 जणांचा समावेश आहे. यामध्ये 40 स्त्रिया व 80 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 961 इतका आहे. यातील 2हजार 850 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज बेलापूरमधील 9, नेरूळमधील 13, वाशीमधील 3, तुर्भेमधील 8 , कोपरखैरणेमधील 7, घणसोलीमधील 2, ऐरोलीमधील 12, दिघा 8 अशा एकूण 62 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 22 स्त्रिया आणि 40 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीत 1हजार 943 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 168 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.