ETV Bharat / state

Molestation Case : धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग; नराधमाला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Accused Arrested In Dombivli

Molestation Case : डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका विवाहितेची छेड करून पीडितेशी लगट करून तिचा विनयभंग करणाऱ्या, नराधमाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी १२ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. हरिषकुमार सुदुला (वय २७, रा, विक्रोळी पूर्व) असं अटक नाराधमाचं नाव (Thane Crime) आहे.

Molestation Case
विवाहितेचा विनयभंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 10:14 PM IST

ठाणे Molestation Case : पीडित विवाहिता घाटकोपर परिसरात पत्नी मुलांसह राहते. तर नराधम सुदुला हा विक्रोळी पूर्व भागात असलेल्या टागोर नगरमध्ये राहतो. त्यातच पीडित विवाहिता घाटकोपरहून डोंबिवलीमध्ये नातेवाईकाला भेटण्यासाठी पती आणि मुलांसह आली होती. तर नराधमही डोंबिवलीमध्ये कामानिमीत्त आला (Thane Crime) होता.

लोकलमधील गर्दीचा घेतला फायदा : २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकातून सीएसटीकडे जाणाऱ्या पाच नंबर फलाटावरुन जलद लोकलने जनरल डब्यात घाटकोपरपर्यंत पीडित विवाहिता, पती आणि मुलांसह प्रवास करीत होती. त्याचवेळी नराधम सुदुला हाही डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या त्याच जनरल डब्यातून प्रवास करत असतानाच डोंबिवली स्थानकातच डब्यात चढताना त्याने पीडितेची छेड काढली होती. त्यानंतर डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान लोकलमधील गर्दीचा फायदा घेत, नराधमाने पीडितेशी लगट करून विनयभंग केला.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिली तक्रार : घाटकोर रेल्वे स्थानकातही डब्यातून उतरताना त्याने छेड काढत पळून गेला. मात्र या घटनेनंतर पीडिता भयभीत होऊन पतीला घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पीडित विवाहितेने २४ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडेलला प्रकार सांगताच पोलिसानी नराधमावर भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता, गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याला विक्रोळी भागातून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक डोंबिवली लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -

  1. Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा
  2. Solapur Crime News : पूजेसाठी फुले आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद
  3. Teen Agers Girls Molestation: १५ वर्षीय मुलीचा सफाई कामगाराने केला विनयभंग, पॉक्सोच्या गुन्ह्यात आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.