ठाणे - डोंबिवली एमआयडीसी परिसरातील डी मार्ट नजीक कल्याण डोंबिवली महापलिकेच्या वतीने फिरते शौचालयाची सुविधा करण्यात आली होती. मात्र, दुपारच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने तब्बल 11 लाखांच्या फिरत्या शौचालयालाच आगीच्या हवाली केले. या आगीत शौचालय संपूर्ण जळून खाक झाले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाकडून शहर हागणदारीमुक्त व उघड्यावर नागरिकांनी शौच करायला नको म्हणून पालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागात फिरते शौचालयांच्या सुविधा पुरवण्यात आल्या. पालिका प्रशासनाकडे 15 फिरते शौचालय असून त्यापैकी 5 ते 6 फिरते शौचालय नादुरुस्त होवून बंद अवस्थेत आहे. या फिरत्या शौचालयाची देखभाल व दुरूस्ती पालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागामार्फत करण्यात येते. या विभागाकडून नगरसेवक व नागरिकांच्या मागणीनुसार फिरत्या शौचालयाची सुविधा पुरविण्यात येते.
डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात डी मार्ट नजीक नागरिकांना एका फिरते शौचालयाची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार तब्बल 11 लाखांचे फिरते शौचालय नागरिकांना शौचसाठी उभे करून ठेवण्यात आले होते. मात्र, दुपारच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने फिरत्या शौचालयालाच आगीच्या हवाली केले. ही आग इतकी भयंकर होती की, आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरले होते. स्थानिक रहिवाशांना वाटले कि कुठल्या तरी कंपनीला पुन्हा आग लागली काय ? मात्र, घटनास्थळी गेल्यावर फिरत्या शौचालयाला भीषण आग लागल्याचे दिसले. एका रहिवाशाने कल्याण अग्निशमन दलाच्या कार्यलयात संपर्क करून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाची 1 गाडी दाखल होवून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, तोपर्यंत संपूर्ण शौचालय जळून खाक झाल होत.
दरम्यान, हागणदारीमुक्त योजनेत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून फिरते शौचालय त्या त्या भागात मागणीनुसार उभी करण्यात आले. परंतु आजही पालिका हद्दीतील ग्रामीण परिसरातील शेकडो रहीवाशांना उघड्यावरच नैसर्गिकविधी उरकावा लागत असल्याचे परिसरातील नागरिकाने सांगितले. तर घनकचरा व्यवस्थापन, कल्याण विभागाचे अधिकारी गणेश बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता. आज सुट्टीचा दिवस असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा - गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा; नराधम शिक्षकाचा ६ शाळकरी मुलींवर अत्याचार