ETV Bharat / entertainment

चित्रपट निर्माते कबीर खान यांनी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - KABIR KHAN AND MAHA KUMBH

कबीर खान हे प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहचले आहेत. त्यांचा एक विमातळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kabir Khan
कबीर खान (कबीर खान (फाइल फोटो) (IANS)))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 29, 2025, 11:55 AM IST

मुंबई : प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यात सामान्य लोकांप्रमाणेच अनेक स्टार्स देखील जात आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान देखील प्रयागराजला गेले आहेत. काल संध्याकाळी ते विमातळावर स्पॉट झाले. इस्लामिक असूनही, कबीर खान महाकुंभमेळ्यात जात आहे. आज ते म्हणजेच 29 जानेवारी रोजी संगमात पवित्र स्नान करतील. तसेच कबीर खानचा प्रयागराजला जाताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, यामध्ये ते महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी उत्साहित दिसले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं होतं, "या गोष्टी हिंदू आणि मुस्लिमांबद्दल नाहीत, तर आपल्या उत्पत्तीबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भारतीय आहात, तर तुम्हाला सर्वकाही अनुभवायला पाहिजे." कबीर खान यांचे हे विधान आता चर्चेत आहे.

कबीर खानची इच्छा : आता सोशल मीडियावर अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये कबीर खान यांनी असंही सांगितलं की, ते काही दिवस प्रयागराजमध्ये राहणार आहेत. याशिवाय त्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानं पापे धुवून आध्यात्मिक मुक्ती मिळते असे मानले जाते. हा महाकुंभमेळा 12 वर्षातून एकदा येत असतो. मुस्लिम असूनही कबीर खाननं कोणत्याही धार्मिक विभाजनाला नकार देत काही सुंदर गोष्टी सांगितल्या. भारतात अनेक धर्मांचे लोक राहातात, मात्र कबीर खानचा हा एकतेचा संदेश अनेकांना आता पसंत पडला आहे.

कबीर खानचं वर्कफ्रंट : कबीर खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडमध्ये दिली आहेत. गेल्या वेळी त्यांनी कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. 'चंदू चॅम्पियन' चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित होता. यापूर्वी त्यांनी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर '83' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. तसेच कबीर खान यांनी सलमान खान अभिनीत 'बजरंगी भाईजान', 'एक था टायगर' आणि 'ट्यूबलाईट' यासारख्या चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा :

  1. 'चंदू चॅम्पियन' चित्रपट पाहिल्यानंतर पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना मिळणार 50 वर्षानंतर अर्जुन पुरस्कार...
  2. 'बजरंगी भाईजान'च्या सीक्वेलबद्दल केला कबीर खाननं खुलासा, वाचा सविस्तर - Bajrangi Bhaijaan
  3. 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार सलग 8 मिनिटांच्या सिंगल टेक वॉर सिक्वेन्सची झलक, ट्रेलरची उलटी गिनती सुरू - Chandu Champion trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.