ETV Bharat / state

ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरात मनसेची आरती, मंदिरे उघडल्याबद्दल सरकारचे मानले आभार - कोपिनेश्वर मंदिर बातमी

राज्य सरकारने आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुहूर्तावर मनसेने अनेक मंदिरात आरती केली. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात मनसेचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व नेत्यांनी काकड आरती केली.

आरतीत सहभागी मनसैनिक
author img

By

Published : Nov 16, 2020, 7:04 PM IST

ठाणे - आजपासून (दि. 16 नोव्हेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्याचा मुहूर्त साधून मनसेने अनेक मंदिरात आरती केली. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात देखील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे नेते अभिजीत पानसे, शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काकड आरती केली. यावेळी राज्यभरातील भाविकांनी राज ठाकरे यांच्याकडे मंदिर उघडण्यासाठी साकडे घातले होते. सरकारने उशिरा का होईना पण सरकारने चांगला निर्णय घेतला, असे म्हणत अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव यांनी सरकारचे आभार मानले.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात अनेक पक्षांकडून मंदिरे उघाडण्यासाठी आंदोलन झाली. भाजपने दारूची दुकाने सुरु आणि मंदिर बंद, असे म्हणत राज्यभर आंदोलन केले शेवटी राज्य सरकारने याबाबत निर्णय घेत मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम

राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभावना लक्षात घेवून आवश्यकता असलेल्या सर्व सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. मंदिरे उघडी झाली तरीही योग्य ती खबरदारी घेवून आपण सार्वजनिक ठिकाणी गेले पाहिजे, असे आवाहन राज्य सरकारने केलेले आहे.

मनसेचे याआधी झाले होते आंदोलन

कोविड काळात विविध विषयांवर मनसेने आंदोलने केली आणि त्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. मंदिराबाबतही ठाण्यात मनसेने आंदोलन केले होते. आता मंदिरे उघडल्याने मनसेने देर आये लेकिन दुरुस्त आये, अशी भावना व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.