ETV Bharat / state

आमदार नाईक यांचा नवी मुंबई महापालिके विरोधात आक्रमक पवित्रा... - आमदार गणेश नाईक ऐऱोली

सद्यस्थितीत नवी मुंबईत सर्व खासगी दवाखाने बंद आहेत, पावसाळ्यात अनेक साथीच्या रोगांचा नागरिकांना सामना करावा लागतो, या परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार आहे. मात्र, वाशीमध्ये असणारे नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय हे कोविड रुग्णालयात जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अडचणींचा सामना करावा आहे. या बाबत आमदार नाईक यांनी नाराजी व्यक्त केली

mla naik
आमदार गणेश नाईक
author img

By

Published : Jul 15, 2020, 7:57 AM IST

नवी मुंबई - ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात पालिकेला वारंवार सूचना करूनही त्या सूचनाचे पालन झाले नाही, त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच वाशी येथील पालिका रुग्णालय कोविड मुक्त करून सर्व सामान्य रुग्णांसाठी खुले करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नवी मुंबईतील ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश यांनी पालिका मुख्यालयात जाऊन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. नवी मुंबई वाशी मधील महानगरपालिका रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत सर्व खासगी दवाखाने बंद आहेत, पावसाळ्यात अनेक साथीच्या रोगांचा नागरिकांना सामना करावा लागतो, या परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार आहे. मात्र, वाशीमध्ये असणारे नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय हे कोविड रुग्णालयात जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अडचणींचा सामना करावा आहे.

आमदार गणेश नाईक

सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 1200 बेडचे तात्पुरते कोविड रुग्णालयात उभारण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून, वाशी येथील पालिका रुग्णालय कोविड मुक्त करून सर्व सामान्य रुग्णांसाठी खुले करावे, अशी मागणी गणेश नाईक यांनी केली होती. मात्र त्याची पूर्तता अजूनही न झाल्याने गणेश नाईक हे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेण्यास पालिका मुख्यालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी मिसाळ यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वाशी पालिकेचे रुग्णालयात कोविड मुक्त करण्यात येऊन सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नाईक यांना दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.