नवी मुंबई - शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांची वाढली संख्या लक्षात घेता कोविड सेंटरमधील यंत्रणा तयार व सक्षम ठेवा, अशी सुचना आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या भेटीनंतर गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
समाजमंदिरे नागरिकांसाठी खुली करावीत
शहरातील पालिकेच्या अनेक समाजमंदिरांमधून सध्या कोरोना चाचणी केंद्र सुरू आहेत. मात्र त्यामधून होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे ही समाजमंदिरे नागरिकांकरीता सामाजिक कार्यासाठी खुली करावीत, असे नाईक यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता पुढील काही दिवस थांबू. कोरोना आटोक्यात आला तर ही समाजमंदिरे खुली करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
हेही वाचा - 'मराठा आरक्षण' न्यायालयात टिकवण्यात राज्य सरकार अपयशी - सुधीर मुनगंटीवार
हेही वाचा - वीज बिलावरून काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये पक्षाअंतर्गत विसंवाद दर्शविणारी - विरोधी पक्षनेते दरेकर