नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनपाला लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के कमी लसी दिल्याचा आरोप भाजप नेते गणेश नाईक यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिका व नवी मुंबई महापालिका यांच्यात राज्य सरकारने दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.
नवी मुंबईसोबत दुजाभाव -
जिल्ह्यातील ठाणे व कल्याण डोंबिवली मनपाच्या तुनलेत 40 टक्के कमी लसींचा नवी मुंबई महापालिकेला केला आहे. ही अंत्यत भयाण बाब असून, लसीकरण पुरवठ्या संबंधी हा दुजाभाव का? असा सवाल भाजप नेते गणेश नाईक यांनी विचारला आहे.
राज्य सरकारने नवी मुंबई मनपाला दिलेली रक्कमही अंत्यत कमी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर शहराच्या तुलनेत नवी मुंबई शहराला पुरवण्यात आलेली रक्कमही अल्प होती, असेही नाईक यावेळी म्हणाले.
लसीच्या बाबतीत राजकरण करू नका -
कोरोना लसींचा पुरवठा करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नका, असा इशाराही नाईक यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. तसेच ठाण्याला व कल्याण डोंबिवलीला जसा लसींचा पुरवठा केला आहे तसाच नवी मुंबई शहराला करावा, अशी मागणीही नाईक यांनी राज्यशासनाकडे केली आहे.
हेही वाचा - ३० एप्रिलपर्यंंत दारू दुकाने बंद; वाइन शॉपवर मद्यप्रेमींची गर्दी