ETV Bharat / state

कोरोना व्हायरस : मीरा भाईंदर शहरात पुन्हा ला‌ॅकडाऊन - मीरा भाईंदर कोरोना बातमी

लाॅकडाऊन दरम्यान, शहरातील किराणा, भाजी बाजार तसेच मांस विक्री करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. केवळ दूध विक्रेत्यांना सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. या काळात नागरिकांची गैर सोय होऊ नये म्हणून घरपोच सुविधा देणाऱ्या विक्रेत्यांना सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

mira-bhayander-city-lock-down-again-at-thane
मीरा भाईंदर शहरात पुन्हा ला‌ॅकडाऊन...
author img

By

Published : Jun 30, 2020, 5:58 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांचा एकूण आकडा तीन हजारांवर गेला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांच्या आकड्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा १ जुलैपासून शहर पुर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. मीरा भाईंदर आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी आदेश जारी करून जनतेकडून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

मीरा भाईंदर शहरात पुन्हा ला‌ॅकडाऊन...

मीरा भाईंदर महानगरपालिकेने 5 जून रोजी आदेश काढून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात मिशन बिगिन अगेननुसार बऱ्याच बाबींमध्ये सूट दिली. P1 व P2 तत्वावर सम व विषम तारखेला दुकाने चालू करण्याचे आदेश आढले. मात्र, नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर, दुकानात गर्दी केली. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. 1 जून ते 30 जूनपर्यंत 2 हजार 427 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कंटेन्मेंट झोनची संख्या 1 हजार 129 वर पोहोचली. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्यातचा निर्यण घेण्यात आला आहे. हा लाॅकडाऊन 10 जुलैपर्यंत असणार आहे.

लाॅकडाऊन दरम्यान, शहरातील किराणा, भाजी बाजार तसेच मांस विक्री करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. केवळ दूध विक्रेत्यांना सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. या काळात नागरिकांची गैर सोय होऊ नये म्हणून घर पोच सुविधा देणाऱ्या विक्रेत्यांना सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच औषधाची विक्री करणाऱ्यांना यातून वगळण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

किराणा दुकान- पूर्णता बंद
दूध डेअरी - सकाळी 5 ते 10 पर्यंत सुरू
औषधाची दुकाने - सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू (केवळ औषध विक्रीकरिता) रुग्णालयातील दुकाने 24 तास सुरू
पिठाची गिरणी - नेहमी प्रमाणे सुरू
इतर आस्थापनातील सर्व दुकाने - पूर्णता बंद
भाजीपाला, फळे, किराणा (केवळ होम डिलिव्हरी) सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.